Manasi

तुझं स्वप्न आणि माझं प्रेम

तुझ्या स्वप्नांची उडान
खूप मोठी आहे
त्यापुढे माझ्या प्रेमाची
उंची थोडी लहान आहे. 

तुझ्या स्वप्नांच्या ...
आड मी येणार नाही,
माझ्या सावलीचही रूप
तुला दाखवणार नाही.

पण तुझी मी वाट
पाहणार आहे,
तुला दिलेलं वचन
                 मी पाळणार आहे