Vinit Dhanawade

" … बाबा…. "(भाग दुसरा )
« on: October 05, 2014, 06:18:49 PM »
सुरेखाला जाऊन आता २ महिने होत आलेले. अविनाश आता कुठे सावरत होता. दोन महिन्यात आदित्यने एक-दोनदाच आईची आठवण काढली. छोटी दीपा तर आईला जवळपास विसरलीच होती. आणि त्यांना आईची आठवण येऊ नये म्हणून अविनाशने घरात सुरेखाचा फोटोही लावला नव्हता.

सर्व काही सुरळीत चालू झालेलं पुन्हा. अविनाश नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला होता. आदित्य आणि दीपा मात्र जाम खूष होते. कारणच तसं होतं ना. त्यांचा "बाबा" आता त्यांच्यासाठी खूप वेळ देत होता. सकाळी सकाळी छानपैकी मजा-मस्ती करत आंघोळ व्हायची तिघांची. मग नास्ता करून दोघांनाही शाळेत सोडायला जायचा. शाळा सुटण्याचा अगोदरच त्यांचा बाबा हजर असायचा. आता भार्गवी ताई येत नव्हती शाळेतून घरी आणण्यासाठी. शाळेतून ते तसेच भार्गवीकडे जायचे आणि अविनाश पुन्हा ऑफिसमध्ये. थोडयावेळाने अवि घरी यायचा, तोपर्यंत आदित्य आणि दिपाचा homework झालेला असायचा भार्गवी ताई कडेच. मग बाबा आला कि धमाल सुरु व्हायची. छान जेवण बनवून द्यायचा " बाबा " त्यांना. ते खाऊन मग रात्री गोष्ट सांगायचा. गोष्ट ऐकतानाच झोपी जायचे दोघेही, छान ना….

त्यात कमी होती ती फक्त सुरेखाची. अविनाश मुलांसोबत कितीही आनंदी वाटला तरी तो आतून पुरता ढासळलेला होता. सुरेखाची खूप आठवण यायची त्याला. एवढा सोन्यासारखा संसार ती अर्ध्यावर सोडून गेली होती. मुलं काय ती तर लहान होती अजून पण त्यांना किती दिवस तो खोटं बोलणार होता. त्याला खूप रडावसं वाटे. पण त्यांच्या समोर तो रडू शकत नव्हता. असा एकही दिवस गेला नसेल कि त्याला सुरेखाची आठवण झाली नसेल. सुरेखा असती तर किती बरं झालं असतं असा विचार तो नेहमी करायचा.   

(पुढे वाचा. ........
http://vinitdhanawade.blogspot.in/2014/10/blog-post.html

आवडली तर नक्की share करा. )
Thanks & Regards,

Vinit R. Dhanawade.

Vinit Dhanawade

Re: " … बाबा…. "(भाग दुसरा )
« Reply #1 on: October 20, 2014, 05:15:16 PM »
हि गोष्ट वाचून मला खूप जणांच्या प्रतिक्रिया आल्या कि त्यांना गोष्ट वाचताना रडू आले. काहीजणांनी तर अंगावर काटा आला असेही सांगितले. पण एका मुलीनी सांगितले कि " please , असं लिखाण करत जाऊ नका…. वाचताना मनाला खूप त्रास होतो." तिने कथेचा शेवट बदलावा अशीही विनंती केली. खरंच कथेचा शेवट मला बदलायला हवा का ?
Thanks & Regards,

Vinit R. Dhanawade.