Vinit Dhanawade

                पुढच्या दिवशी, सगळी टीम शेवटच्या स्पॉटवर गेली. तिथे सुद्धा जवळपास तसच होतं. बोटांचे ठसे, एक कार सापडली होती. चोरीचा कोणताच उद्देश नाही. अभिने ते सगळं महेशला बघायला सांगितलं. तो watchman ला शोधत होता. "मंदार देशपांडे" ला कोणी पाहिलं होतं का ते शोधत होता तो. वर महेश, त्या स्पॉटवर काही शोधत होता. inspector म्हात्रे खाली अभी सोबत होता. म्हणून Sub - inspector कदम, महेश ला माहिती सांगत होते."हे यशवंत पवार म्हणजे  कालच्या स्पॉटचे , त्यांचा मुलगा आणि सून… " महेश ऐकतच सगळीकडे बघत होता.

             मोठी सोसायटी होती. एकंदर तीन गेट होते सोसायटीला. प्रत्येक गेटसमोर watchman होता. तीन गेटमुळे inspector अभिषेकच जरा गोंधळाला. त्याने रात्रीच्या watchman ला बोलावून घेतलं होतं, तसे ते सगळे आलेले होते. शिवाय सोसायटीचा सेक्रेटरीही हजर झाला होता.
" रात्री झाले ना खून… त्यावेळी कोणी आलेलं का… " अभीने तिन्ही watchman ला विचारलं.
" हा सर… त्यावेळी म्हणजे ९ वाजता एक जण आलेला… " अभीने लगेच तिन्ही स्केचेस मागवली. त्यातलं एक watchman ने ओळखलं.
" हा सर… हाच आलेला… ",
"आणि किती वाजता गेला ? ",
" ते माहित नाही मला…. म्हणजे आम्ही ती नोंद करत नाही ना… ",
"असा का ….?",
"सर, इथे ३ गेट आहेत… आलेले पाहुणे, कोणत्याही गेटने बाहेर जातात… मग आमचीच पंचाईत होते. म्हणून ती नोंद नाही करत.",
"ok, आणि काही सांगू शकता का ?",
"हा… त्याच्या हातात एक छोटी bag होती… जरा घाईतच होता तो. ",
"मग तुम्ही असं direct आत सोडता का कोणालाही… " ,
"नाही सर, आम्ही आधी call करतो ,ज्या घरी पाहुण्यांना जायचे असते…. जर त्यांनी सांगितलं तरच आम्ही त्यांना वर सोडतो.",
" इकडेही सांगितलं का तुम्हाला त्यांनी… ",
"हो….मीच सांगितलं कि मंदार देशपांडे आले आहेत… तर ते बोलले कि लगेच पाठवून दे वर… " अभी पुन्हा विचारात पडला.

                  सगळे पोलिस स्टेशनला आले. सर्व स्पॉट बघून झालेले होते आता. जे काही पुरावे मिळाले होते, ते सर्व समोर होते. तरी महेश काहीतरी शोधत होता. अजून थोडावेळ पोलिस स्टेशन मध्ये बसून महेश,अभी हॉटेलच्या रूमवर आले. अभी अजून विचारात होता. महेश त्याच्याकडे बघत होता.
"कसला विचार चालू आहे एवढा ? ".
" हा… हो, मला वाटते काहीतरी मिसिंग आहे…. काय नक्की ते आठवत नाही… "अभी पुन्हा सगळं पाहू लागला. अचानक अभी ओरडला… " अरे हो… आपण बाकी सगळीकडे चेक केलं, पण सुरेश पवार…. त्याच्या घरी तर चेकच केलं नाही आपण काही… कारण तो तर हॉटेलवर होता ना. त्याची माहिती तर अपूर्ण राहिली. त्याच्या घरी जायला पाहिजे. तिथे काही माहिती मिळू शकते." अभी बोलला.
" हा, उद्या जाऊया सकाळी." महेश जरा त्रासिक आवाजात म्हणाला.
"काय रे… ?" अभीने विचारलं.
"जरा अंग दुखते आहे रे… झोपतो मी… " ,
"हो… आणि आजारी पडू नकोस हा… मला मदत कोण करणार मग… ?" ,
"अरे …. आहे ना तो म्हात्रे… करेल ना तो मदत. ",
"तो कसला मदत करतोय… स्वतःच सैरभैर असतो… सगळी माहिती, आपण सांगितलं तेव्हा गोळा केली. पहिली केस असली म्हणून काय झालं,  असं घाबरून चालते का पोलिसांनी… " ,
" पहिली केस म्हणजे ?", महेशने प्रश्न काढला.
"अरे तो कदम सांगत होता, या म्हात्रेची पहिलीच केस आहे ते. नुकतीच बदली झाली इथे आणि लगेच हि केस समोर आली. मला वाटते म्हणून असा बावरला आहे तो. " अभी म्हणाला.
"कमाल आहे यार… एवढी मोठी केस, कोणत्यातरी अनुभवी ऑफिसरला देयाची ना…. म्हणून तर, त्याला अजून कळत नाही, कोणत्या प्रसंगाला काय करायचे ते." महेश बोलला.
" जाऊदे ते… तू झोप जा आणि उद्या तयार रहा. आपण दोघेच जाऊ, त्याच्या रूमवर. " म्हणत अभी त्याच्या रूम मध्ये आला.

                      सकाळीच दोघे जण "सुरेश पवार" यांच्या राहत्या घरी, काही माहिती मिळते का ते बघायला गेले. मोठ्ठा flat होता. दरवाजाची बेल वाजवताच नोकराने दार उघडलं. या दोघांबरोबर दोन हवालदार आणखी आलेले होते. महेशने त्या दोघांना सोबत घेऊन लगेचच तपासाला सुरुवात केली. अभी असाच इकडे तिकडे पाहत होता. एका भिंतीवर त्याला एक फोटो दिसला. जवळ जाऊन बघतो तर सुरेश पवार यांचा लग्नातला फोटो, त्यांच्या पत्नी बरोबर. अभिने हाताने खूण करूनच नोकराला बोलावलं.
" या कोण ? ",
"या madam आमच्या… ",
" मग ,त्या दिसल्या नाहीत ते एवढे दिवसात…. त्यांना माहित आहे ना, इकडे काय चाललय ते…कूठे बाहेर गावी असतात का त्या ? " अभीने विचारलं.
" नाही साहेब… त्या या जगात नाही आता.",
"म्हणजे काय नक्की ? " अभी आश्चर्यचकित झाला.
" अहो साहेब…. माहित नाही का तुम्हाला… तुमच्याच पोलिस स्टेशन मध्ये तर complaint नोंदवली आहे कि, त्यांनी आत्महत्या केली ना…. " अभिला हे माहितच नव्हतं. तितक्यात महेश बाहेर आला.
" काय झालं अभी ? " महेशने अभिला tension मध्ये बघून विचारलं.
" अरे याचं लग्न झालेलं… ",
" हो… ते कळलं मला, आत फोटो सापडले काही…. ",
" हा, मग त्याच्या बायकोने आत्महत्या केलेली ते कळलं का तुला ? " महेशने नकारार्थी मान हलवली. " तेच तर… आणि हा सांगतो कि आपल्याच पोलीस स्टेशन मध्ये complaint नोंदवली आहे …. म्हात्रे कूठे काय बोलला या बाबत आपल्याला. " अभी म्हणाला.
" हा म्हात्रे पण ना…. काय करावं त्याचं कळत नाही." महेशही बोलला शेवटी.
" साहेब मी बोलू का ?" एका हवालदाराने मधेच तोंड उघडलं.
" हम्म … बोल " अभी म्हणाला.
" म्हात्रे सर तर आताच रुजू झाले आहेत ना त्यामुळे त्यांना माहिती नसेल या केसची… ",
" हा मग , कोणीतरी handle करत असेल ना हि केस…",
" हो सर , आधीचे सर होते ना, त्यांच्याकडे होती हि केस… सावंत सरांना माहिती आहे ते. " अभीला राग आला होता, त्याने दाखवला नाही तो. " ठीक आहे चला पोलिस स्टेशन मध्ये. तिकडे बघू काय ते." तसे सगळे निघाले.

             


(पुढे वाचा.

http://vinitdhanawade.blogspot.in/2016/05/blog-post.html

आवडली तर नक्की share करा.)
Thanks & Regards,

Vinit R. Dhanawade.