Vinit Dhanawade

" Wrong Number…… !!! " ( भाग पहिला ) New
« on: December 06, 2014, 01:19:01 PM »
" शट् यार…. चार्जर कुठे राहीला…. " अक्षता तिच्या मोबाईलचा चार्जर शोधत होती घाईघाईत. कुठे ठेवला ते तिला आठवतंच नव्हतं. तशी अक्षता विसळभोळी नव्हती. तरीही आज तिला चार्जर भेटतच नव्हता. खूप शोधला पण चार्जर समोर येण्यास तयार नव्हता.

आता अचानक चार्जरची आठवण कशी झाली ? काल ऑफिसमधून उशिरा घरी आली अक्षता. मोबाईल तसाच बेडच्या बाजूला ठेवून झोपी गेली. खूप दमलेली ती ना. नाहीतर रोज ऑफिस मधून आल्या आल्या , खूप लोकांसारखी ती सुद्धा प्रथम मोबाईल charging ला लावते. बरं, रात्री मोबाईल charge केला तरी सकाळी सुद्धा ऑफिसला जाण्याआधी तिला मोबाईल charge करण्याची सवय. त्यात आज रविवार. सुट्टीचा दिवस म्हणून रोज लवकर उठणारी अक्षता, आज जरा बेडवरच झोपून Time-pass करत होती. आज काही घाई नाही, धावपळ नाही. मस्त time-pass करायचा आज. बेडवर पडल्या पडल्याच मोबाईल वरून तिची chatting चालू होती , friends नी काय काय post केलं आहे FB वर ते चेक करत होती, कोणाचा वाढदिवस आहे वगैरे. सगळी काम झोपूनच चालू होती.

थोडयावेळाने तयार होऊन घरातली कामे सुरु झाली. आवराआवर , केरकचरा वगैरे गोष्टी झाल्या आरामात. ऑफिस नसल्याने डब्बा करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुपारचे जेवण बाहेरून मागवले , छानपैकी एकदम. त्यात मध्ये मध्ये मोबाईल बरोबर चाळे चालू होते तिचे. भरपेट जेवून , TV बघत बघत छान दिवस गेला. दुपारची मस्त झोप काढून झाली होती तिची. संद्याकाळचे ५ वाजले तेव्हा तिच्या मोबाईलच्या रिंगने तिला जाग आली. मित्राचा call आला होता. त्याच्या बरोबर जरा वेळ बोलून झाले आणि तिचे लक्ष मोबाईलच्या Battery indicator गेलं. " १६%" एवढीच charging राहिली होती मोबाईल मध्ये.तेव्हा तिला चार्जरची आठवण झाली आणि लागलीच ती चार्जर शोधायला लागली.     

( पुढे वाचा.   आवडली तर नक्की share करा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2014/12/wrong-number.html )
Thanks & Regards,

Vinit R. Dhanawade.