msanglikarदिनकर कदम ... माझा कॉलेजमधला मित्र. पुढे पोलिस इन्सपेक्टर झाला. गेली दोन वर्षे पुण्यातच होता. गेल्या वर्षी एक दोनदा त्याच्या घरी जाऊन भेटून आलो होतो. आज पुन्हा जाणे झाले.

रात्री आठ वाजता मी त्याच्या घरी गेलो तेंव्हा तो अजून यायचा होता. वहिनींनी मस्तपैकी चहा केला. चहा घेतला, नंतर एक मासिक वाचत बसलो...

तेवढ्यात दिनकर आला.
मी विचारले, ‘कुणाचा मर्डर झाला?’
‘एका तरुण इंजिनीअरचा खून झाला...’
‘मग आता खूनी कधी सापडणार?’
‘पकडलं पण तिला..’
‘तिला? म्हणजे खूनी महिला होती?’
‘होय.. त्याची मैत्रीणच होती. त्याने तिच्याशी लग्न करायला नकार दिला म्हणून तिने त्याचा चक्क खून केला’
‘कमाल आहे.. स्त्रीने पुरुषाचा खून करणे म्हणजे जरा अवघडच आहे’
‘त्यात काय अवघड... या बायका इरेला पेटल्या तर टोकाला जाऊ शकतात एकदम. सरळ गोळ्या घातल्या त्याच्या डोक्यात त्या बयेनं’
‘कमाल आहे... मग तिथंच बसली असेल रडत... तुझं खूनी शोधायचं काम सोपं झालं असेल’
‘छ्या छ्या.... ती चालली होती पळून.... मोबाईल फोनचं लोकेशन ट्रेस करून पकडलं तिला लोणावळ्याजवळ... जरा जास्तच हुशार होती... फोन स्वीच ऑफ ठेवला होता बराच वेळ, आणि आडवाटेनं तिची गाडी पळवत होती.. ’
‘माफिया गॅंग मधली होती की काय ती बया?’
‘माफिया नाही रे... बड्या घरची... बाप उद्योगपती आहे. सुटणार बहुतेक... मी कितीही भक्कम केस तयार केली तरी...’

ही घटना ऐकून मी जरा धास्तावलोच. म्हणालो, ‘अलीकडच्या बायका परफेक्ट गुन्हे करायला लागल्यात की का?’
‘अरे काय सांगायचे एकेक किस्से तुला.... डोकं चक्रावून जातं... एकेका किस्स्यावर एकेक कादंबरी लिहू शकशील तू... साले ते पुरुष गुन्हेगार बिनडोकच असतात अस वाटायला लागलाय मला आता. नीट प्लॅनिंग करताच येत नाही त्यांना बहुतेकदा. मग दोन फटके दिले की गुन्हा कबूल करतात. पण या बाया जबरदस्त प्लॅनिंग करतात. पकडल्या गेल्या तर मनाचा थांग पत्ताच लागू देत नाहीत. कितीही फटके द्या... हजारो वर्षे नव-यांचा मार खाऊन त्यांच्या जिन्समध्ये निगरगट्टपणा आलेला असावा’
‘मग पुरुष बायकांना बिनडोक का समजतात’
‘आपला इगो कुरवाळण्यासाठी, दुसरं काय... बर ते जाऊंदे, तू काय म्हणत होतास दुपारी फोनवर?’

मग मी त्याला दिशापुराण ऐकवले. तिने माझ्यावर पोलीस केस केली असल्याचे सांगितले.
त्यावर दिनकर म्हणाला, ‘तुला माहिती आहे कायदे बायकांच्या बाजूने आहेत. तू चांगलाच अडकलेला दिसतोस.....’
हा पूर्ण भाग येथे वाचा:

http://mahaakatha.blogspot.in/2014/06/blog-post_9.html