msanglikar

गर्ल्स होस्टेल 2
« on: April 17, 2015, 10:50:44 PM »
 -महावीर सांगलीकर

मी कॅप्टन विक्रम सिंग याला बालगंधर्वच्या शेजारच्या एका हॉटेलमध्ये यायला सांगितलं होतं. तिथं मी गेलो तर अगदी त्याच वेळी तो तिथं आला. तो मिस्टर पंक्चुअल होता. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी हजर. दोन मिनिटं आधी नाही की दोन मिनिटं उशीरा नाही. ट्रॅफिक जाम होते, मीटिंग होती, झोपलो होतो असले बहाणे त्याच्याकडून ऐकायची पाळी माझ्यावर कधीच येत नसे.

त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न असे. त्यावर टेन्शनच्या कसल्याही खाणाखुणा दिसत नसत. ‘टेन्शन देने का भी नही और टेन्शन लेने का भी नही’ असं तो नेहमी म्हणत असे.

कॅप्टन विक्रम सिंग.. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधनं आर्मीत गेला आणि चार पाच वर्षातच रिटायरमेंट घेऊन परत आला. तोपर्यंत त्याच्या नावावर बरीच पदकं आणि पराक्रम जमा झाले होते. सध्या पुण्यात एक इंडस्ट्रीअल सिक्युरिटी अॅण्ड डिटेक्टिव्ह एजन्सी चालवत असे. बक्कळ पैसा मिळत असे, पण त्या कामात त्याला फारसा इंटरेस्ट नव्हता. त्याच्या हाताखालचे लोक ती एजन्सी व्यवस्थित चालवत असत.

आम्ही दोघं हॉटेलमधल्या एका टेबलावर जाऊन बसलो.
मी त्याला विचारलं, ‘काय घ्यायचं?’
‘फक्त चहा’

त्याच्यासाठी चहापेक्षा काम महत्वाचं होतं. डायरेक्ट कामाचं बोललेलं त्याला आवडत असे. वेळ वाया घालवणे, आपल्याशी संबंध नसलेल्या, नसत्या विषयावर चर्चा करणे त्याला अजिबात आवडत नसे. क्रिकेट आणि पॉलिटिक्स या गोष्टींची त्याला माझ्यासारखीच अॅलर्जी होती.

मी त्याला कामाची थोडक्यात कल्पना देऊ लागलो. मनात म्हंटलं, हा हे काम स्वीकारणार आहे. लगेच होकार देईल.

‘डन’, तो ते काम ऐकल्यावर लगेच म्हणाला, ‘रुटीन काम करून बोअर झालोय यार. हे काम इंटरेस्टिंग वाटतंय’

‘आणि चॅलेंजिंग देखील’ मी हसत म्हणालो.

‘माझ्यासाठी हे काम अजिबात चॅलेंजिंग नसेल, कारण मी अशा प्रकारचे काम केलं आहे. आर्मीत असताना. तिथं ज्या मुलींचा मी सामना केला, त्यापुढे या सिव्हिलिअन मुली किरकोळ आहेत. जस्ट चेंज म्हणून हे काम स्वीकारतोय’ 

पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/04/2.html