msanglikar

-महावीर सांगलीकर

शिवानी द ग्रेट या कथेचा 6वा भाग

शिवानीला गुडबाय करून तिचा मोटिव्हेटर थोड्याच वेळात रेल्वे स्टेशनवर पोहोचला. समोर लोकल उभीच होती. त्या लोकलने 25 मिनिटातच तो चिंचवडला आला.  घरी जायचे आणि झोपायचे असा त्याचा विचार होता. इतक्यात त्याचा मोबाईल फोन खणखणला. शिवानीचाच फोन.

तिला गुडबाय वगैरे म्हटलं असलं तरी त्याला पक्कं माहीत होत की हे गुडबाय कधीच होऊ शकत नाही. किमान तिचं सगळं व्यवस्थित होईपर्यंत तरी. एकदा का ती व्यवस्थित सेटल झाली की आपण तिच्यापासून कठोर मनानं दूर जाण्याचा प्रयत्न अवश्य करू. तसं करायलाच लागेल.

त्याला आठवलं, मागे ती व्हाट्स अॅपवर चॅट करताना म्हणाली होती,
‘मामा, असं कुणात जास्त गुंतून जाणं बरोबर नाही. माणसं टिकत नसतात. कुणी निघून गेलं की डिप्रेशन येतं मग’
‘हे बघ, माझं न्यूमरॉलॉजिकल रीडिंग सांगतय की आपली मैत्री अतूट असणार आहे. फेविकॉल से भी मजबूत. आपली सारखी भांडणे होतील. त्याचा आपल्याला खूप त्रासही होईल. पण आपली भांडणे आपले संबंध तुटेपर्यंत कधीच होणार नाहीत. आपलं प्रत्येक भांडण फारतर दीड-दोन तास टिकेल. आपल्या भांडणातून प्रत्येक वेळी कांही तरी खूप चांगलं घडणार आहे. आतापर्यंत तसंच झालय. तरीपण मला कधी कधी भीती वाटत असते... तू माझ्यापासून दूर चालली आहेस असं उगीचच वाटत रहात. पण माझा न्यूमरॉलॉजीवर पूर्ण विश्वास आहे. 4-8 relations never dies ’
‘पण उद्या माझं लग्न होईल. मग तुम्ही काय कराल?’
‘रडेन... बाप आपल्या मुलीचे लग्न झाल्यावर रडतो तसा.... आनंदाने ... एका मोठ्या जबाबदारीतून मी मुक्त झालो म्हणून.... आणि तू मला सोडून चाललीस म्हणून दु:खाने’ त्याच्या डोळ्यात आसवे आली.
‘तुम्ही म्हणालात की 4-8 relations never dies. मग तुम्ही कशाला उगीच काळजी करता?’

त्यानं पटकन तिचा फोन उचलला.
‘बोलं शिवानी’
‘मामा, तुम्ही मला स्पिरिच्युअल टच देऊन तुमच्या इच्छा माझ्या मनात सोडल्या. तुमच्या इच्छा काय आहेत ते तुम्ही सांगितले नाही, पण मी तुमच्या सगळ्या इच्छा रिसीव्ह केल्या’
‘माहीत आहे मला. पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. काय आहेत माझ्या इच्छा?’

पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/03/blog-post.html