anagha

ARTICLE-SAKHA-SAKHI
« on: October 17, 2013, 03:54:59 PM »
सखा सखी
सखी शेजारिणी तू हसत रहा, हसत रहा
हास्यात फुले गुंफीत रहा...
प्रत्येक व्यक्तीला सखा, सखीची अगदी लहानपणापासून गरज असते.तान्ह्यबाळासाठी  त्याची आई ही सखी असते. तिच्या मायेच्या सावलीत सुरक्षितपणे हा जीव लहानाचा मोठा होत होत स्वतःच्या पायांवर उभा राहतो. आपले आई-बाबा, भावंडे, मित्र हे आपले सखाच असतात. इंग्रजीत म्हण आहे, फ्रेंड  इन नीड इज अ फ्रेण्ड   इनडीड. मित्र, जो कोणतीही अपेक्षा न करता आपल्या मित्रांना अडीअडचणीच्या वेळी  हवी ती मदत करतो, विठ ठल माउलीसारखा तो मित्रांसाठी धावत येतो, तो खरा सखा.
जमिनीतून बाहेर येणाऱया नवांकुरांना भूमातेच्या कुशीची ऊब मिळते .
ते आईरूपी भूमातेला म्हणत असतील,
अंकुरले जीवन भूमातेच्या उदरी,
`सखा' बनूनी फेडू ऋण जन्म-जन्मांतरी।।
निसर्गाचे रहाटगाडगे हे एका कोणामुळे  चालत नाही, तर हातात हात घालून पक्षी, फुले, पाने, डोंगर, दऱ्या , झाडे, वेली, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या सहवासाने फुलते. ते एकमेकांचे सवंगडीच आहेत. नाही का?
आपला सृष्टिकर्ता सूर्यदेव, त्याला मित्र म्हटले आहे. ॐ मित्राय नमः। आपल्याला शक्ती, प्रकाश, तेज, उष्णता, डी व्हिटमिन कोणतीही अपेक्षा न करता तक्रार, अहंभाव, स्वार्थापणा न करता निसर्गाचे, पर्यायाने आपल्या सर्वांच्या जीवनाचे रहाटगाडगे चालवत असतो. सूर्यस्तुती म्हणतांना आपण म्हणतो,
जयाच्या रथा एकच चक्रपाही।
नसे भूमी आकाश, आधार काही।
असे सारथी पांगुळा ज्या रथासी।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।
असा हा सूर्यतारा स्वयंप्रकाशित तर आहेच; पण आपल्या सर्वांचा लाडका सखा आहे. लोककल्याण करायला तो सज्ज असतो.
ईश्वरभक्तीत फार मोठी ताकद असते. अंतःकरणापासून केलेली भक्ती ही निर्मळ आनंद, शक्ती, उत्साह, दीर्घायुष्य, प्रेम, माया, काम करण्याची प्रेरणा आपले मन निर्मळ करून `ईश्वर' सखारूपी आपल्या पाठीशी सदैव उभा असतो.
 
आपले गुरू, चांगली पुस्तके, ग्रंथ, वाचकाला ज्ञान, मनोरंजन, व्यापक दृष्टी देतात. आई-बाबांनंतर गुरू हा आपले जीवन योग्य रितीने घडवतो. प्रसंगी रागावून, मायेने तो आपला व्यक्तिविकास करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला एक चांगला, सुसंस्कारित, बलवान, सुशिक्षित असा नागरिक बनवतो. गुरू हा आपला फार जवळ चा सखाच नाही का?
हल्लीच्या यंत्रयुगात यंत्रच आपले सखा / सखी आहेत नाही का? भाताचा कुकर, तीन-तीन शिट्टया देत भात झाल्याची वर्दा देतो. तुमचा लाडका मायक्रोवेव्ह एक-दोन मिनिटांत चहा, कॉफी करून देतो. आठवा बरे आणि कोण कोण ते? मिक्सर, मोबाइल, बँक बलन्स, आय कार्ड, आपले लाडके वॉशिंग मशिन कपडे धुते, डिश वॉशर डिश विसळ तो. आपली लाडली पर्स, सखी, ती जर जवळ नसली तर काय काय होईल नाही? आपण बावचळून जाऊ, हो ना?
त्यात काय काय असते? अं सांगू ना? पेरूचा घडा, पेन, रूमाल, चावी, घडयाळ , डबा, आयकार्ड, मोबाइल अरे हां, विसरलेच होते! लाडकी सखा `मेकप बॉक्स', त्यातला तो `आरसा' सखा, आपल्याला बघून गाली हसतो ना? सांग दर्पणा कशी मी दिसते? तोही `फारच छान दिसते,' असे म्हणतोच ना? (अन् नाही म्हटले तर....) आपली लाडकी सखी रोजच आपण तिच्या रोजी-रोटीवर जगत असतो, आपली ती `नोकरी' लाडकी सखीच ना? तिच्यासाठी म्हणू या.... `कशासाठी पोटासाठी खंडाळयाच्या घाटासाठी.....'
आपल्या घरात राहणारा, माया, प्रेम, प्रामाणिकपणा असणारा, रोजचा थकवा घालवणारा, `डॉगी' हा आपला सोबती, सखाच नाही का?
आपला अन्नदाता शेतकरी आपला सखाच आहे. देशाचे रक्षण करणारा, त्यासाठी स्वतःच्या प्राणाचा बळी देणारा सैनिक हा सखाच तर आहे.
आपला रोजचा पेपरवाला, दूधवाला, इस्त्रीवाला, तसेच आपल्या कामांना मदत करणारी कामवाली आपली सखीच नाही का? हे सगळे संपावर गेले तर? तर काय दैना होईल आपली! सुख-दुःखात साथ देणारा आपला सात जन्मांचा प्रेमळ सखा, सप्तपदी ज्याच्या सोबत चाललो, आणाभाका घेतल्या, सुखी संसारात त्याच्या सोबत रमून गेलो तो पतिदेव आपला लाडका, सर्वांत जवळचा सखा, हो ना सख्यांनो. त्यांच्यासाठी `सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवे ते... शतजन्मीचे हे माझे नाते. हो, ही गोड भेट त्या सख्याला. :) :)