anagha

marathi article gruhini.
« on: October 08, 2013, 05:31:15 PM »
गृहिणी
गृहिणी गृहिणी दार उघड    
थांब माझ्या बाळाला अंघोळ  घालू दे.
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्याबाळालातीट लावू दे.
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्या बाळ झोपवू दे.
चिमणे चिमणे दार उघडची आठवण आली ना? काय? माझे चुकले असे वाटते का? बघा त्रयस्थ नजरेने. आले ना लक्षात? क्षणात कसे बरे ती `गृहिणी तुमच्यासाठी दार उघडेल!
कामात असे ना ती? अगदी चोवीस तास! हो नशीब तिचे की तिच्यासाठी, तिच्या विश्रांतीसाठी नियतीने केलेली सोय म्हणू या हवे तर, की रात्र होते.
घरातल्या लोकांच्या काळजीपोटी ही बिचारी झोपते न झोपते, तिचा डोळा लागतो ना लागतो, तोच फटफटीत सकाळ उजाडते.
तिने कितीही ठरवले तरी मॉर्निंग वॉक काही तिच्या नशिबी नसतो. सकाळचा दोन-चार वेळा होणारा चहा, नाष्टा, सकाळ चा `टिफिन, रोजची कटकटच ती. काय करू? काय करू? नी काय करू?
दुपारच्या जेवणाची व्यवस्था भांडी, धुणी, खरकटी `रांधा, वाढा, उष्टी काढा हेच तिच्या नशिबी असते की काय? अंघोळ, देवपूजा, पेपरवाचन, टीव्ही की झाली संध्या, रहाटगाडगे चालूच. नाष्टा, चहा, पुन्हा ऑफिसमधून  येणाण्यांची वेळ  व तिची भाजी आणायची वेळ एकच. पुरती त्या संसाराच्या चाकात अडकून जाते. जीव मेटाकुटीला येतो. वाटते, सर्व साखळदंड क्षणात तोडून दूरवर धावत सुटावे. क्षितिजाला, आकाशाला गवसणी घालावी, उंच भरारी घ्यावी.
निसर्गाची, संध्याकाळ ची मजा लुटावी, सुर्यास्ताची छबी, घरी परतणारी पाखरे, गुरेढोरे, तो छानसा संधीप्रकाश अनुभवावा, पण छे! `भाजीत लक्ष असते ना? थोडया मैत्रिणींशी गप्पाटप्पांची देवाणघेवाण होते. त्यातही गप्पांचे विषय काही साहित्यिक, मजेशीर, काव्यात्म, असे नसतातच आज काय मेनू? हे कसे बनवतात? आज काय कामवालीच आली नाही? कामवालीने ते काम नीट केले नाही? आज काय भांडीच जास्त होती, मशीनच लावायचे राहून गेले? आज काय पाणीच आले नाही, इत्यादी. एव्हांना संध्याकाळ संपलेली असते. आवडत्या टीव्ही मालिका बघत बघत रात्रीचा स्वयंपाक, उद्याची प्राथमिक तयारी, पुन्हा तीच तीच आवराआवर, की झाली रात्र! काम काम आणि काम; कामाच्या रगाडयातूनच स्त्री-जन्मा केव्हा रे बाबा तुझी सुटका होणार? देव जाणे!
नोकरी करणाण्या स्त्रीची तारेवरची कसरत तर विचारूच नका, पण तिला `स्वऽची जाणीव असते. ती `कमवती म्हणून तिची जागा जरा वरच्या पोस्टवर असते. गृहिणी काय? काय काम असते, घरीच तर असते? केले सर्वांसाठी तर काय बिघडले? गृहिणीला योग्य मान मिळत नाही. विचार करा. घरातली `गृहिणी ही तुमचीच कोणीतरी असते. बायको, आई, बहीण, आजी, मावशी, तिलाही काही स्थान आहे. ती कायमची संपावर गेली तर काय होईल? विचार करा. तुमचे हाल होऊ नये, म्हणून ती वेळेवर सर्व करते. प्रत्येकाचे मन सांभाळते, आरोग्य सांभाळते  , प्रत्येकाच्या आवडीचे करून खाऊ घालते, योग्य संस्कार, चांगल्या, वाइटाची जाण, आल्यागेल्याचे स्वागत, त्यांच्यासाठी काहीतरी, मग विचार करा, `ती जर इतके करते तर तिला आपण कामात मदत केली पाहिजे. तिला योग्य `मान व योग्य `मानधनही पाहिजे. ते तिचे स्वतःच्या हक्काचे असेल. त्यातून ती आपली आवडनिवड करू शकेल. (काही लोक या गोष्टीसाठी सहमत होत नाहीत का ते माहीत नाही.)
तिचे मन सांभाऊले पाहिजे, व्यवहार, बाहेरचे जग, दुसरे देश, तिच्या मनाचा होणारा कोंडमारा, तिचे स्वास्थ्य जे सर्वांत महत्त्वाचे आहे. तिची शारीरिक  ,. क्षमता ... का ती एखाद्या वेळी चिडचिड करते? तिचेही काही प्रॉब्लेम्स आहेत का? तिच्या भावनांची कदर खरेच घरातल्या सर्वांना आहे का?  सर्वांनी मानसिकता का बदलू नये? ती न संपणारे, न थांबणारे यंत्र आहे का? ती तुमच्यासारखीच हाडामांसाची बनलेली आहे. तिला (गृहिणीला) नीट समजावून घ्या. तिला सर्व दृष्टीने आधार द्या. ती तुमच्यावर प्रेम करते, मदत करते. तुमच्यासाठी त्याग करते, काय नाही करत ती तुमच्यासाठी? तुम्हीही तिला प्रेम, माया द्या. कामाची वाटणी करा. मग बघा, प्रत्येक जीवन कसे निकोप होते ते. तिच्या आरोग्याची काळजी घ्या. मायेने, आस्थेने तिची विचारपूस करा. तिला सर्व दृष्टीने, आर्थिक, मानसिक, कायिक, वाचिक तिची आवड, छंद जोपासा, त्याचे कौतुक करा. तिला आधार वाटेल असे करा. तिचे आशीर्वाद तुम्हांला मोठे करतील यात शंका नाही. एक कविता सुचत आहे
`गृहिणी
सर्वांना ती घरी हवी हवी,
(सर्वांच्या) सेवेला ती तत्पर ऐन वेळी,
 त्याग करिते `स्व जीवनाचा॥
`गृहिणी सर्वांत उच्च तुझे हे पद,
नकोस मानू ते तू दुय्यम स्थान,
तूच मोठा आधार या सदनाला
`गृहिणी तुझे आशीर्वाद लाभू दे सर्वांना।
लक्ष्मी तू या घरची,
वाचवते पै पै तू कष्ट करूनी,
नाही जाणार हे कष्ट वाया तुझे,
तुझेच ना ग हे लाडके घरटे?।
भक्कम आधार बनून रहा तू येथेच,
नको लेखू स्वतःला कमी।
सत्य काय ते तुलाच ठाऊक
घराचे मंदिर करण्यास तू सदैव आतुर॥