|| कहाणी मुंबईची ||

एक शहर आहे जागात
म्हणतात ते फार वेगळे आहे,
जे मी अनुभवले ते तेथेच राहून तुम्हाला सांगतो आहे,
पण प्रत्याकाच्या सांगायची एक वेगळीच पद्धत असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.

सकाळी उठणे हे सुद्धा एक काम आहे,
रात्रीची झोप हा फक्त काल्पनीक आराम आहे,
दात घासणे, आंघोळ करणे यासाठी पुरेसा वेळ नाही,
नाश्ता करत असताना तयारी करणे यापेक्षा मजेशीर खेळ नाही,
देवासमोर एक मिनीट हिच आमची देवपुजा असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.

बिल्डीँगचा गेट सोडला कि रांगांची रांग लागते,
रिक्षा बस ट्रेनचे टिकीट अगदी काहिहि कारण चालते,
रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणुस धावत असतो,
मिनीटाला शंभर पाऊले असा इथे नियम असतो,
रस्ता आपल्याच बापाचा समजून चालायचे असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.

शिव्या देत शिव्या खात प्लँटफाँर्मवर पोहोचायचे असते
मुंग्यांमधली साखर शोधावी तसे मित्रांना शोधायचे असते
ट्रेनमधले मित्र मैत्रीला जागणारे असतात
एकामुळे दुसऱ्याला जागा मिळेल असे जागा अडवून बसतात
रिझर्वेशन नसुनही प्रत्येकाची जागा फिक्स असते
हि मुंबई आहे इथे असेच असते.

घरी पोहोचण्याचा विचारच फार आनंददायी असतो
पण पुन्हा ट्रेन बस हा विचारच मनाला टोचत असतो
आईच्या हातचा चहा हेच घरी पोहोचल्याचे समाधान
तिची सिरीयल माझी मँच यासाठी रिमोटची ताणाताण
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल पहायची असते
हि मुंबई आहे इथे असेच असते.

जेवणानंतर लगेच झोप एक वाईट सवय आहे,
म्हणूनच बाहेर फेरफटका आता आमची गरज आहे,
एका तासात चाळीतल्या नव्या जुन्यांची खबर होते,
आपणही याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होते,
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परतायचे असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.

असाच हा नित्यक्रम सोमवार ते शुक्रवार असतो,
पण बाकिचे दोन दिवस आमचा दिनक्रम बदलतो,
जे पाच दिवस भेटले नाहीत असे मित्र भेटतात,
मग थिएटर, पब, बिचेस, टेरेस सगळी ठिकाणे गाजवतात,
आईला एक दिवस आराम हे बाहेर जेवण्याचे कारण असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.

असा हा आठवडा त्याचेच महिने घडावे,
दिवसातील चोवीस तासही इथे कमी पडावे,
अशी हि श्रमाची बँक जिथे तक्रार काउंटर नाही,
मैत्रीचे व्याज मिळत राहत राहते पण जास्त नोटा मात्र नाहीत,
शोधनाऱ्यासाठी सगळे आहे फक्त वेळ मात्र मिळत नसते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.