msanglikar.............मग एका पत्रात तिने लिहिले, मला तुम्हाला भेटायचे आहे. Please…. तुम्ही मुंबईला आलात की मला भेटायला या. जर मुंबईला येणार नसाल तर मी पुण्याला येते. पण मला तुम्हाला भेटायचेच. तिची ही मागणी मला मुळीच मान्य नव्हती. मी तिला समजावून सांगणारे एक पत्र लिहिले:

मला माहीत आहे की आपण मैत्रीच्या पलीकडे पोहोचलो आहोत. कधी कधी मलाही वाटते की तुला भेटावे, पण मी तो विचार लगेच झटकून टाकत असतो. आपले काय ठरले होते? आपण आयुष्यात कधीच भेटायचे नाही. कितीही भेटावेसे वाटले तरी. तू कबूल केलेली गोष्ट तुला पाळावीच लागेल.

तिचे उत्तर आले, ‘पण का? का नाही भेटायचे? आपण जे ठरवले होते, ते दोघेही मिळून रद्द करूया आणि भेटूया. निदान एकदा तरी’.

माझे परत उत्तर, ‘नाही, मुळीच नाही. आणि आता तर तुला न भेटण्यामागे माझ्याकडे आणखीही मोठी कारणे आहेत. एकतर तू मोठ्या घरची लेक आहेस. तुझ्यापुढे मी एक सामान्य माणूस आहे. आपली कोणत्याही बाबतीत बरोबरी होवू शकत नाही. या जगात प्रेमाबरोबरच व्यवहारही पाहिला पाहिजे. प्रेम म्हणजे सर्व कांही नव्हे. त्यामुळे पुन्हा मला भेटण्याचा आग्रह करू नकोस. आपण मित्र झालो, पण आपली मैत्री देखील व्हर्च्युअलच आहे. त्याच्यापुढे आपल्याला जायचे नाही. आपण एकेमेकांसाठी व्हर्च्युअल रहाण्यातच शहाणपणा आहे.

या पत्रामुळे दिशा थोडी नाराज झाली. तिने लिहिले, ‘जशी तुमची मर्जी. तुम्हाला भेटायचा विचार मी मोठ्या मुश्किलीने मनातून काढून टाकला आहे. तुम्ही तुमच्या आणि माझ्या परिस्थितीची मोकळेपणाने तुलना केली तिचे कौतुकही वाटले आणि ती खटकली देखील. तुम्ही मला ओळखण्यात कमी पडला आहात मिस्टर सांगलीकर. तुम्ही स्वत:लाही नीट ओळखलेले नाहीत असे मला वाटते. असो.

आपली कधी ना कधी, कुठे ना कुठे, या जन्मात नाही तर पुढील जन्मात, या जगात नाही तर दुस-या जगात गाठ पडेल अशी मला आशा वाटते..

आता आपण काय करायचे? पत्रव्यवहार असाच चालू ठेवायचा का? की आपण आता एकमेकांना विसरून जायचे? मी तर तुम्हाला विसरू शकत नाही, तुम्हाला काय करायचे हे तुम्हीच ठरवा.’

पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2014/04/blog-post.html