msanglikar

भारतात जे महान इंग्रज अधिकारी होवून गेले, ज्यांना भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल खूप आपुलकी वाटत होती, त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे  मायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब.

मायकेलचा जन्म इंग्लंडमधील लिसेस्टर या शहरात झाला होता. त्याला  लहानपणापासूनच वेगवेगळी वाद्ये वाजवण्याची आवड होती. वयाच्या केवळ १५ व्या वर्षी नशीब काढण्यासाठी तो आपला थोरला भाऊ जॉर्ज याच्याबरोबर भारतात आला.  मायकेलला इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी मिळाली. जॉर्ज बॉन्डलाही कोठेतरी नोकरी मिळाली, पण भारतातील उकाड्याने हैराण होवून तो कांही महिन्यातच  इंग्लंडला परत निघून गेला. (पुढे त्याच्या चौथ्या पिढीत जगप्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बॉन्ड जन्माला आला.)

लवकरच मायकेल बॉन्ड  हे इस्ट इंडिया सैन्यात एका ब्यांड पथकाचे प्रमुख  झाले.  भारतीय सैनिक त्यांना ब्यांडसाब या नावाने ओळखत, पुढे ब्यांड हेच आडनाव त्यांना चिकटले.

ब्यांड साहेबांच्या पथकाने  1857च्या युद्धात मोठाच पराक्रम गाजवला होता. मीरत येथे इंग्रज सैनिकांच्या एका बराकीला बंडखोरांनी घेरले होते आणि हे बंडखोर त्या सैनिकांना पेटवून देण्याच्या तयारीत होते. पण ऐनवेळी ब्यांड साहेब आपल्या पथकासह तेथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या पथकाला वाद्यांचा भयानक आवाज करायचा हुकूम दिला. त्या गगनभेदी आवाजाने बंडखोर सैनिकांना पळता भुई थोडी झाली.  ते चक्क आपल्या कानात बोटे घालून शरण आले. ....

Read more at: http://mahaakatha.blogspot.in/2014/05/blog-post_21.html