msanglikar

शिवानी द ग्रेट
« on: October 10, 2014, 02:30:39 AM »
 
-महावीर सांगलीकर

‘शिवानी, तुझा रिपोर्ट तयार आहे. आपण कधी भेटायचं?
‘उद्या...?’ तिनं विचारलं.
‘एक मिनिट...’ असं म्हणत त्याने कॅलेंडरकडं बघितलं. मग म्हणाला, ‘ओके, उद्या दुपारी भेटू’
‘मी उद्या सकाळी फोन करून किती वाजता भेटायचं ते कन्फर्म सांगते. त्याचं काय आहे, उद्या आख्ख्या भारताला सुट्टी असली तरी आमच्या ऑफिसचं काय खरं नाही. उद्या मला सुट्टी असली तर दुपारी भेटू, नाहीतर मग संध्याकाळी भेटू’
‘ओके’ असं म्हणून त्यानं फोन बंद केला.

या डेंजरस मुलीला भेटायला उद्याची तारीख आणि वार ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी त्यानं कॅलेंडरकडं बघितलं होतं.

त्याची आणि शिवानीची ओळख फेसबुकवर झाली होती. त्यानं तिला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली आणि तिनं ती लगेच स्वीकारलीही. तो सहसा मुलींना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवत नसे. ती खूप सुंदर होती. पण तिला रिक्वेस्ट पाठवण्यामागं तिचं सुंदर असणं हे कारण नक्कीच नव्हतं. तो असल्या गोष्टींच्या पलीकडं गेला होता. त्याचा त्यालाच प्रश्न पडला, का बरं आपल्याला हिला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवावी असं वाटलं? आणि का ती आपल्याशी एवढ मनमोकळेपणानं चॅटिंग करते?

आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यानं तिचं फेसबुक प्रोफाईल चेक केलं. तिची जन्मतारीख 8 होती.
‘तरीच’ तो मनात म्हणाला. त्याच्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर त्याला मिळालं होतं. पण हे एवढंच कारण होतं का?
या मुलीनं तिच्या आयुष्यात बरंच कांही सहन केलेलं दिसतंय,  तिच्या जन्मतारखेवरनं त्याला अंदाज आला.
पुढे एकदा चॅटिंग करत असताना ती तिनं भोगलेलं दु:ख सांगू लागली. ते फारच भयानक होतं. कोणतीही मुलगी सांगायला धजावणार नाही असं. तो ओरडला, ‘स्टॉप..स्टॉप.. मला पुढ सांगू नकोस. मला ऐकवत नाही’
तिचे फोटो बघून त्यानं बरेच अंदाज केले होते. तिच्या सुंदर चेह-यामागे आणखी बरंच कांही होतं. चांगलं आणि वाईट. तिच्या उजव्या गालावर एक सुंदर खळी होती. तिच्या कपाळावर डाव्या बाजूला एक मोठा तीळ होता. तिच्या नाकाच्या शेंड्यावर एक अस्पष्ट आणि बारीक तीळ होता. तिच्या गळ्याच्या उजव्या बाजूला कॉलर बोनच्या वरच्या बाजूस शेजारी-शेजारी असलेले दोन मोठे तीळ होते. एखादा नाग डसल्यावर जशी खूण उमटेल तसे दिसणारे.  त्यानं आजपर्यंत हजारो चेहरे वाचले होते, पण तिळांची अशी जोडगोळी तो पहिल्यांदाच बघत होता.

पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2014/10/blog-post.html