msanglikar

-महावीर सांगलीकर


किल्ल्यातली  ही  मंदिरे आपल्या ओळखीची का वाटतात? पूर्वी कधीतरी इथे येवून गेल्यासारखे वाटते. पण या प्रदेशात तर आपण पहिल्यांदाच आलो आहोत..... विचारांच्या या तद्रीतच मी त्या किल्ल्याच्या बाहेर पडलो. गावात जाणारा रस्ता ओळखीचा वाटत होता. त्या रस्त्यावरून मी गावात शिरलो. एका हवेलीसमोर माझी पाउले थांबली.   मी त्या हवेलीत शिरलो. तेथे कोणीच दिसत नव्हते. जरा आत गेलो तर सोप्यात एका कडेला एक छोटी मुलगी कॉम्प्यूटरसमोर बसली होती. माझी चाहूल लागताच ती माझ्याकडे न बघताच जोरात म्हणाली, ‘देखो बडी दादी, कौन आया है..’

थोड्याच वेळात आतून एक आजीबाई बाहेर आल्या. माझ्याकडे निरखून बघायला लागल्या. तो चेहरा माझ्या ओळखीचा वाटत होता, पण मी त्यांना कोठे बघितले होते ते आठवेना.

त्या म्हणाल्या, ‘आखीर आ ही गये तुम’. त्या तसे का म्हणाल्या मला कळले नाही. मी त्यांना वाकून नमस्कार केला. ‘जुग जुग जियो बेटा’ असे त्या पुटपुटल्या.  नंतर एका खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाल्या, ‘बैठो बेटा .. तब तक मैं तुम्हारे लिये कुछ बनाती हूं’. मग त्या मुलीकडे बघत म्हणाल्या, ‘सलोनी, कॉम्प्यूटर बंद करो और महावीर अंकल से बातें करो’ आणि परत आत गेल्या. मला आश्चर्य वाटले. या आजीबाईना माझे नाव कसे काय माहीत?

सलोनीने कॉम्प्यूटर कांही बंद केला नाही, ती तिच्याच नादात होती. मी तिला हाक मारली,
‘सलोनी बेटा, कौन सा गेम खेल रही हो?’
‘मैं गेम नहीं खेलती’ तिने माझ्याकडे न बघता उत्तर दिले.
‘फिर क्या कर रही हो?’
‘मैं एक प्रोग्राम बना रही हूं’
तिचे हे उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले. सलोनीचे वय फार तर सात  वर्षे असावे. या वयात ही प्रोग्राम बनवते? खात्री करून घेण्यासाठी मी विचारले, ‘तुम कौनसी क्लास में पढती हो?’
‘सेवंथ स्टॅंडर्ड’ तिने उत्तर दिले.
तिच्या या उत्तराने मला आश्चर्याचा धक्का बसला. असे कसे शक्य आहे? की ही मुलगी तिच्या वयापेक्षा छोटी दिसते?
‘तुम्हारी उम्र सात साल है ना?’
‘हां....’

पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2014/05/blog-post_17.html