msanglikar

अनबिलिव्हेबल दिशा
« on: December 29, 2014, 12:22:01 AM »
-महावीर सांगलीकर

मी सायबर कॅफेतून बाहेर पडलो आणि सलीम भेटला. म्हणाला, ‘तुलाच शोधत होतो. तू 16 डिसेंबर बघितलास का? खूप चांगला आहे म्हणे. मी आज रात्रीचा शो बघणार आहे. येणार का?’
या सिनेमाबद्दल मी बरेच कांही ऐकले होते, वाचले होते. तो बघायचाच होता, पण सलीमला लगेच होकार देण्याऐवजी मी म्हणालो, ‘आज रात्री...? जरा अवघडच आहे. मला एक महत्वाचे काम आहे. ते लवकर झाले तर  मी येण्याचा प्रयत्न करेन’.
‘काय ते नक्की सांग, म्हणजे मी तिकिटे काढून ठेवतो’
‘ओ.के., नक्की येतो. काढ तिकिटे. पण मी माझे काम आटोपून मग डायरेक्ट थिएटरवर येतो. बरोबर सव्वा नऊ वाजता’.
‘चालेल, मी वाट बघतो’ असे म्हणून सलीम निघून गेला.

मग दिवसभर मी माझी इतर कामे केली, आणि संध्याकाळी सात वाजता टेलेफोन बूथवर गेलो. दिशाला फोन लावला.
‘हाय दिशा, हाऊ आर यू?’
‘कशी असणार? ठीक आहे’ तिचा आवाज थोडासा उदास वाटत होता.
‘अजून डोकं दुखतय वाटतं तुझं?”
‘महावीरजी, आज दुपारी आणि परवा मी तुमच्यावर उगीचच रागावले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर इट. सम टाईम्स आय बिकम व्हेरी अग्रेसिव्ह एंड डॉमिनंट’
‘तो तुझा दोष नाही, तुझे नंबरच तसे आहेत’
‘परत न्यूमरॉलॉजी?’
‘होय. तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा नंबर ठरतो. प्रत्येक नंबरचे कांही बेसिक गुणदोष असतात. ते तुम्हाला कायमचे चिकटून बसतात. कधी कधी हे गुणदोष उफाळून येतात. त्याला आपण कांही करू शकत नाही’
‘तुमचा बर्थ नंबर 4 आहे. हा बर्थ नंबर असणारे लोक तापट असतात असे मी वाचले होते. पण तुम्ही कधी माझ्यावर रागावला नाहीत, रागवत नाही, हे कसे काय?’
‘मी खरेच तापट आहे, अगदी निष्ठूरही आहे. पण मी नेहमीच जिनिअस, टॅलेंटेड लोकांचा आदर करतो. अशा लोकांवर मी कधीच रागवत नाही. माझा सगळा राग लो आय.क्यू. असणा-या, कॉमन सेन्स न वापरणा-या लोकांवर निघत असतो’
‘असे होय, मला वाटले मी तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही माझ्यावर रागवत नाही’
‘ते कारण आहेच, पण केवळ एखादी व्यक्ती आवडते म्हणून तिच्यावर रागवायचे नाही असे कुठे असते? तुझ्या जागी दुसरे कुणी असते तर मी ‘गेली उडत’ असे म्हणालो असतो आणि संबंध तोडले असते. शिवाय मी तुझ्याकडे एक केस स्टडी म्हणून बघतोय, डॉक्टरने पेशंटकडे बघावे तसे... डॉक्टर पेशंटवर रागवत नसतात’
‘हो क्का...?’

मग तिने वेगळाच विषय काढला. अचानक ती म्हणाली, ‘तुम्ही 16 डिसेंबर पाहिला का?’. तिच्या या प्रश्नामुळे मला आश्चर्य वाटले. तिने हा प्रश्न नेमका आजच का विचारावा? केवळ योगायोग? पण मी ते न दाखवता म्हणालो, ‘नाही पाहिला, आज रात्री बघणार आहे’.
‘जरूर बघा, तुम्हाला आवडेल. फॉर युवर इन्फोर्मेशन, 16 डिसेंबर 22 मार्चला रिलीज झाला होता..’
'आश्चर्य आहे... नक्कीच त्यात  माझ्यासाठी बौद्धिक खाद्य असणार' मी म्हणालो.

परत विषय बदलत ती म्हणाली, ’तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती’
‘कोणती?’
‘पुढच्या आठवड्यात मी इंग्लंडला चालले आहे’
‘कॉंन्ग्रॅट्स.. परत कधी येणार?’
‘मी दोन वर्षे थांबणार आहे तिथे’
‘किती..?’ मी दचकून विचारले
‘दोन वर्षे’
ते ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात.
‘हॅलो, आर यु देअर..? तिकडून आवाज आला.
‘यस...’, मी क्षीण आवाजात कसेबसे म्हणालो.
‘तिथे मी खूप बिझी असणार आहे. आपल्याला फोनवर बोलता येणार नाही सध्यासारखे. नेटवर चॅटिंग पण करता येणार नाही’
मी कांही बोललो नाही.
‘ऐकताय ना?’
‘हं..’
‘मला तुमची नेहमी आठवण येईल. मी अधेमधे इमेल पाठवत जाईन. बट प्लीज डोंट डिस्टर्ब मी बाय सेन्डिंग टू मेनी इमेल्स...’
‘आय विल ट्राय टू कंट्रोल मायसेल्फ’
‘आणि दोन वर्षांनी परत आल्यावर भेटूच आपण प्रत्यक्ष. अर्थातच तुमचा मला न भेटण्याचा विचार तोपर्यंत बदलला असला तर’
मी पटकन म्हणालो, ‘माझा तुला न भेटण्याचा विचार आत्ताच बदललाय दिशा. आय वांट टू मीट यू. उद्या येतो मी मुंबईला....’
‘उद्या मी मुंबईत नाही, बाहेरगावी चाललेय’
‘मग परवा...?’
‘परवा चालेल. या, मी वाट पहाते. आणि उद्या दुपारी बारा वाजता मला कॉल करा. मी मुंबईत नसले तरी सेलफोन माझ्या बरोबरच असेल. बोलू थोडा वेळ...’

पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2014/05/blog-post.html