msanglikar

गर्ल्स होस्टेल
« on: January 18, 2015, 05:10:12 PM »
-महावीर सांगलीकर
 

पुणे हे गजबलेले शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. तिथं गेलो की आपण पुण्यातच आहोत का याची शंका येते. अशाच एका भागात मुलींचे एक होस्टेल आहे. तिथं केवळ 20 मुलींच्याच राहण्याची सोय आहे. त्यातील कांही मुली विद्यार्थिनी आहेत तर कांही जॉब करतात. भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मुली तिथं रहातात. त्यामुळे तिथलं वातावरण एकदम कॉस्मोपोलितन. हे होस्टेल एका ट्रस्ट मार्फत चालवलं जातय.

या होस्टेलची रेक्टर माझी लांबची मावशी. तिची माझी बरेच दिवस गाठभेट नव्हती. मला मागे तिचा दोन-तीनदा फोन आला होता, भेटून जा म्हणून. पण मी कांही तिला भेटायला गेलो नव्हतो. पण परवा तिचा परत एकदा फोन आला, ‘तुला किती वेळा बोलवायचं रे? इन्व्हिटेशन कार्ड पाठवू का? की कार पाठवू तुला आणयला? आता जर तू आला नाहीस तर मी तुला कधीच बोलावणार नाही इकडं. मी हे होस्टेल सोडून चाललेय. बस्स झाली ही कटकट’. हे सगळं ती एका दमात बोलून गेली.
मला वाईट वाटलं. मी विचारलं, ‘का, काय झालं गं मावशी?’
‘तू ये इकडं दोन दिवसाच्या आत. मग तुला सांगते काय झालय ते. नाही आलास तर तुझं स्वप्न अपुरं राहील बघ’
‘माझं स्वप्न? कोणतं?’
‘तेच... गर्ल्स होस्टेल बघायचं स्वप्न. तुला कादंबरी लिहायची होती ना लेडीज होस्टेल या थीमवर?’
‘हां, मी येतोच उद्या... तू अजून किती दिवस आहेस तिथं?’
‘तीन दिवस फक्त’ असे म्हणत तिनं तिने फोन कट केला.

कांहीतरी गंभीर मामला आहे हे माझ्या ध्यानात आलं. दुस-या दिवशी मी माझी सगळी कामे,  अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून होस्टेलवर गेलो. गेट बंद होते. मला बघून वॉचमन गेटजवळ आला.
‘काय पाहिजे?’ असे त्यानं विचारलं.
मी म्हणालो, ‘पाटील बाईंना भेटायचं आहे’
‘त्या आज भेटत नाहीत कुणाला. आज सुट्टी आहे.. उद्या या’
‘त्यांना सांगा त्यांचा भाचा आला आहे भेटायला’
त्यानं मला एकदा न्याहाळलं आणि तो लगबगीने आत गेला. लगेच परत आला आणि गेट उघडले.

‘आलास? मला वाटलं येणार नाहीस’ मावशी मला समोरच्या खुर्चीवर बसायची खूण करत म्हणाली.
‘मावशी, तू होस्टेल का सोडायला लागलीस? एवढी का वैतागली आहेस?’ मी विचारलं.
‘इथल्या पोरींनी वैताग आणलाय नुसता. एकही कार्टी नीट वागत नाही. माझ्या आधीच्या दोन रेक्टर पळून गेल्या वैतागून. आता मी पण चाललेय’
‘नेमका काय प्रॉब्लेम आहे त्या मुलींचा? नीट वागत नाहीत म्हणजे नेमके काय?’
‘ते कळायला तुला या होस्टेलमध्ये येऊन रहायला लागेल’
‘मी? मला कसं काय राहू देतील इथं?’
‘रेक्टर म्हणून येणार का? मॅनेजमेंटवाले स्त्री रेक्टर ऐवजी पुरुष रेक्टर ठेवणार आहेत आता. ते पण वैतागलेत या मुलींच्या प्रॉब्लेम्सना. लेडीज रेक्टर्स पळून जातात म्हणून देखील. तू रेक्टर म्हणून येणार असशील तर मी तुझी शिफारस करेन’
‘पण मला कशाला सिलेक्ट करतील ते रेक्टर म्हणून?’
‘तू ट्राय कर. तू सिलेक्ट झालास तर तुझा मोठा फायदा आहे. तुझ्या कादंबरीसाठी भरपूर मालमसाला मिळेल तुला इथं. एकेक नमुने बघायला मिळतील तुला. कादंबरी लिहायला निवांत वेळ मिळेल तुला तुझ्या क्वार्टरमध्ये रात्री. शिवाय तू या पोरींना वठणीवरदेखील आणू शकशील’
‘सॉरी.... आय एम नॉट इंटरेस्टेड. कुठं या पोरींच्या नादी लागायचं... एखादी जिनिअस मुलगी भेटली तर माझा सगळा वेळ तिच्या भल्याचा विचार करण्यात जातो. माझ्या अंदाजे इथल्या सगळ्याच मुली जिनिअस दिसतात. एखाद दुस-या मुलीचा बाप होणं ही वेगळी गोष्ट आहे. पण वीस मुलींचा बाप? इट्स हॉरिबल. डोक्याचं भजं होईल माझ्या. तसंही मी इंडिव्हिज्युअली एकावेळी एकाच मुलीला सुधरवतो, माझी कामे सांभाळून आणि माझ्या कामाचा भाग म्हणून... पण असं इथं राहून सगळ्यांना सुधरवण्यात मी इंटरेस्टेड नाही... आणि मला वेळ तरी कुठाय इथं येऊन राहायला?’

पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/01/blog-post.html