msanglikar

भयकथा: वॉचब्लॉक
« on: December 20, 2015, 08:15:53 PM »

-महावीर सांगलीकर

फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. स्लेफी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अपलोड करायची. ती फोटोजेनिक, सुंदर, तरुण आणि हसऱ्या चेहऱ्याची होती. त्यामुळं तिच्या फोटोला लाईक्सही भरपूर मिळायचे.
‘सुंदर!’ छान!’ ‘लव्हली’ ‘व्हाट अ स्माईल’ अशा प्रकारच्या अनेक कोमेंट्स यायच्या. त्या वाचून ती हरकून जायची.
अर्थातच तिचे फोटो लाईक करणाऱ्यामध्ये मुलांचाच भरणा होता. मुली तिचे फोटो फारसे लाईक करत नसत. कॉमेंटही देत नसत. जेलसी! दुसरं काय?
कधी कधी तिला प्राईव्हेट मेसेज यायचा, ‘तू खूप सुंदर आहेस’ 
तिला बरं वाटायचं ते वाचून. पण प्राईव्हेट मेसेजला ती सहसा उत्तर देत नसे.
एकदा एक मेसेज आला, ‘तुझं लग्न झालंय का? झालेलं नसल्यास माझा विचार कर’
तिला तो मेसेज पाठवणाऱ्याचा राग आला. पण असं बिनदिक्कत विचारणाऱ्या त्या तरुणाचं फेसबुक प्रोफाईल बघण्याचा मोह ती आवरू शकली नाही. त्या प्रोफाईलवर गेल्यावर तिच्या लक्षात आलं, ते अगदीच फालतू कार्टं होतं. युजलेस अॅण्ड होपलेस गाय.
कांही प्राईव्हेट मेसेज अगदीच घाणेरडे असत. कुणी अश्लिल फोटोही पाठवत असत. अशा लोकांना ती सरळ ब्लॉक करून टाकत असे.

पण एके दिवशी तिला एक आगळा-वेगळा मेसेज आला. ही कोणीतरी नवीन व्यक्ति होती.
‘गेले अनेक दिवस मी बघतोय, तू तुझे फोटो तुझ्या वॉलवर टाकत असतेस. तुझ्या या फोटोंचा दुरुपयोग होऊ शकतो. एक तर तू अतिशय सुंदर आहेस आणि दुसरं म्हणजे तुझे फोटो स्पष्ट आणि हाय क्वालिटीचे असतात. त्यामुळं ते भल्या-बुऱ्या कारणासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे’
आधी तिला हा मेसेज पाठवणाऱ्याचा राग आला. ‘हा कोण मला शिकवणारा?’ असं तिच्या मनात आलं. तो कोण हे बघण्यासाठी तिनं त्याच्या नावावर कर्सर नेला आणि क्लिक केलं. ती व्यक्ति तिच्या वडिलांच्या वयाची होती. प्रसिद्ध व्यक्ति असावी.
तिनं त्या मेसेजला उत्तर दिलं, ‘Thanks. इथून पुढं मी माझे फोटो फेसबुकवर टाकणार नाही, काका!’
तिकडून उत्तर आलं, ‘गुड गर्ल! पण तू आधी टाकलेले फोटो पण डिलीट करून टाक’
ती हो म्हणाली.
नंतर तिनं तिचे सगळेच फोटो डिलीट करून टाकले. अगदी तिचा प्रोफाईल फोटो सुद्धा. प्रोफाईल फोटोच्या जागी तिनं एक फ्लॉवरपॉटचा फोटो ठेऊन दिला.

आणखी कांही दिवस गेले. तिला त्या व्यक्तिचा, काकांचा परत एक मेसेज आला,
‘आज तू फेसबुकवर हिटलरचं पेज लाईक केलं आहेस. ते बघितल्यावर मी तू लाईक केलेले इतर पेजेस तपासले. हिटलर, नथुराम, सद्दाम हुसेन, ओसामा.... मुली, ही कांही चांगली गोष्ट नाही. तुम्ही काय लाईक करता यावरनं तुमचे विचार काय आहेत हे कळतं. तू जिथं जॉब करतेस, तिथल्या वरिष्ठांनी हे बघितलं तर तुझ्याबद्दल त्यांचं मत वाईट होईल. तुला प्रमोशन मिळण्यात अडचणी येतील आणि तू पुढं दूसरीकडं जॉबसाठी प्रयत्न केलास तरीदेखील प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काय आहे, आता जॉब देण्याच्या अगोदर त्या व्यक्तिचं फेसबुक प्रोफाईल तपासलं जातं. ती व्यक्ति काय लिहिते, काय कॉमेंट करते, काय लाईक करते, तिचे मित्र कोण कोण आहेत वगैरे. अगदी तुला बघायला येणारा मुलगा देखील आधी तुझं फेसबुक प्रोफाईल तपासेल आणि मग योग्य वाटलं तरच तुला बघायला येईल. प्राईव्हेट डिटेक्टिक्व्हला पैसे देऊन एखाद्या व्यक्तिची माहिती काढण्यापेक्षा तिचं फेसबुक प्रोफाईल बघून बरीच माहिती मिळवता येते’
ती म्हणाली, ‘Thanks Kaka! आजच मी माझ्या अकाऊन्टची साफसफाई करते’.

मग तिनं रात्रभर जागून आपल्या अनेक फेसबुक फ्रेंड्सना डच्चू दिला. अनेक पेजेस अनलाईक केले.
तिचं फेसबुकवर येणंही कमी झालं.

एके दिवशी whats app वर तिला एक मेसेज आला,
‘हाय! हाऊ आर यू? बरेच दिवस तू फेसबुकवर आली नाहीस. चांगलंच आहे म्हणा! फेसबुकपेक्षा तुझं काम महत्वाचं आहे –काका ’
तिला आश्चर्य वाटलं! या काकांना आपला फोन नंबर कसा मिळाला? मग तिच्या लक्षात आलं, आपल्या फेसबुक अकाउंटला आपण आपला फोन नंबर ठेवला आहे. ती लगेच फेसबुकवर गेली आणि तिनं आधी आपला फोन नंबर तिथनं डिलीट केला.
दुसऱ्या दिवशी त्या काकांच्याकडनं whats app वर आणखी एक मेसेज आला, ‘बरं झालं, तू तुझा फोन नंबर फेसबुकवरनं डिलीट केलास ते!’
ती अस्वस्थ झाली. हे काका सारखं आपलं फेसबुक प्रोफाईल का चेक करतात? पण तिनं या मेसेजला उत्तर दिलं नाही.

पुढे काका तिला सारखे whats app मेसेजेस पाठवू लागले. ती ते वाचायची. बहुतेक सगळे मेसेजेस तिनं कसं वागायला पाहिजे या विषयीच असायचे.

एकदा तिनं काकांचं whats app स्टेटस चेक केलं. तिथं लिहिलं होतं,
‘Beware!!! I am  watching you, always!’
तिला थोडी भिती वाटली.
तिनं काकांना मेसेज पाठवला, ‘PLZ remove your whats app  status. Please.... मला भिती वाटते त्या स्टेटसची’
‘ok ok... लगेच रिमोव्ह करतो. पण तुला भिती वाटायचं कारणच काय? तू तर नारायण धारपांच्या कथा रात्री तीन-तीन वाजेपर्यंत वाचत असतेस. तुझी भिती मरून गेली असेल आत्तापर्यंत’
या काकांना कसं कळलं आपण धारपांच्या कथा वाचतो, त्याही रात्री उशीरापर्यंत?

पूर्ण कथा पुढे वाचावी:
http://mahaakatha.blogspot.in/2015/12/blog-post.html