msanglikar

भयकथा: न जन्मलेली बाळं
« on: January 09, 2016, 09:22:52 PM »
-महावीर सांगलीकर

थोड्याचं दिवसात सुमन प्रेग्नंट राहिली. यमुनाताईनं किशोरला सांगितलं, तिची सोनोग्राफी कर... मुलगा आहे की मुलगी ते बघ. या कारणासाठी सोनोग्राफी करायला बंदी असली तरी कांही ठिकाणी अशी तपासणी गुपचूपपणे व्हायचीच. किशोर आपल्या बायकोला घेऊन तशा एका हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरनं भरपूर पैसे घेऊन सांगितलं, मुलगी आहे. ते ऐकून त्याचा चेहरा उतरला. घरी येऊन त्यानं आईला सांगितलं तर तिनं धिंगाणा घातला. ती सुनेवर ओरडली, ‘मला वाटलंच होतं.... आता पाडून टाकायचं.... ठेवायचं नाही अजिबात’. सुमन या गोष्टीला तयार झाली नाही. मग सासूनं तिला उपाशी ठेवलं, तिचा आणखी छळ करायला सुरवात केली. नवरा तिला मारहाण करू लागला. तरीही ती ऐकत नाही हे बघून त्या दोघांनी सुमनला जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं.

डॉक्टरनं भरपूर चार्जेस लावत पोटातल्या त्या मुलीला मारून टाकलं.

पुढचं वर्ष आलं. सुमन पुन्हा प्रेग्नंट राहिली. किशोर तिला घेऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरनं सुमनची पुन्हा सोनोग्राफी केली. तिच्या पोटात पुन्हा मुलगीच वाढत होती. त्याचा चेहरा पुन्हा एकदा उतरला. घरी गेल्यावर त्याच्या आईनं गेल्यावेळेपेक्षा जास्तच धिंगाणा घातला. ती सुमनचा आणखीन छळ करू लागली.
सुमन ला पुन्हा जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मग डॉक्टरनं पुन्हा भरपूर पैसे घेत त्या मुलीला जन्मायच्या आधीच मारून टाकलं.

पुढच्या वर्षी हे सगळं पुन्हा एकदा झालं.

आपल्या बायकोच्या पोटात मुलीच वाढतात हे बघून किशोरच्या मनात दुसरं लग्न करायचा विचार आला. पण आहे हीच बायको मोठ्या मुश्किलीनं मिळालेली आहे, दुसरी बायको कुठनं आणणार या विचारानं तो ताळ्यावर आला. त्यात त्याच्या एका मित्रानं त्याला सांगितलं, ‘मुलगा की मुलगी हे नवऱ्यावर ठरत असतं, यात बायकोचा कांही संबंध नसतो. मुलगी होणं याला जर तू दोष मानत असशील तर तो दोष तुझा आहे, तुझ्या बायकोचा नाही’.

पुढे सुमन चौथ्यांदा प्रेग्नंट राहिली. पुन्हा मुलगी. नवऱ्यानं आणि सासूनं तिला बडवून काढलं. तिच्या पोटात लाथा घातल्या. सुमन बेशुद्ध पडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सुमन मेली असल्याचं डॉक्टरनं सांगितलं. हा तर डबल मर्डर होता. पण डॉक्टरनं भरपूर पैसे घेऊन सुमनचा नैसर्गिक मृत्यू झाला असं सर्टिफिकेट देऊन टाकलं.

आठवडाभर गेला आणि एक विचित्र घटना घडली. त्या हॉस्पिटलमधली एक नर्स, जी असल्या प्रकारची कामं करण्यात एक्स्पर्ट होती, एकदा रात्र पाळीला असताना तिला तिथल्या ऑपरेशन थिएटरमधनं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि बंदही झाला. तिला थोडी भिती वाटली, पण दुसऱ्या एका नर्सला, वार्डबॉयला सोबत घेऊन तिनं मोठ्या धाडसानं ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. लाईट लावली. आत लहान मुल वगैरे कांहीच नव्हतं. तरीपण ते तिघं सगळं थिएटर भीत-भीत धुंडाळू लागले. एवढ्यात अचानक लाईट गेली. ते तिघं घाबरून दरवाज्याच्या दिशेनं पळाले. पण दरवाजाजवळ पोहोचायच्या आतच तो खाडकन बंद झाला. तिघं इतके घाबरले होते की त्यांच्या तोंडून आवाजही फुटेना. एवढ्यात त्या अंधारात त्यांना एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. मग आणखी एका बाळाच्या रडण्याचा. रडणाऱ्या बाळांची संख्या वाढत चालली. शेकडो बाळे. आता ती हसू लागली. त्यांचं हसणं कुणालाही भिती वाटेल असंच होतं.

पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचावी:
http://mahaakatha.blogspot.in/2016/01/blog-post.html