msanglikar


न जन्मलेली बाळं
आठवडाभर गेला आणि एक विचित्र घटना घडली. त्या हॉस्पिटलमधली एक नर्स, जी असल्या प्रकारची कामं करण्यात एक्स्पर्ट होती, एकदा रात्र पाळीला असताना तिला तिथल्या ऑपरेशन थिएटरमधनं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि बंदही झाला. तिला थोडी भिती वाटली, पण दुसऱ्या एका नर्सला, वार्डबॉयला सोबत घेऊन तिनं मोठ्या धाडसानं ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. लाईट लावली. आत लहान मुल वगैरे कांहीच नव्हतं. तरीपण ते तिघं सगळं थिएटर भीत-भीत धुंडाळू लागले. एवढ्यात अचानक लाईट गेली. ते तिघं घाबरून दरवाज्याच्या दिशेनं पळाले. पण दरवाजाजवळ पोहोचायच्या आतच तो खाडकन बंद झाला.
पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2016/01/blog-post.html

वॉचब्लॉक
मग रात्री नऊ वाजता ती जेवायला म्हणून बाहेर पडली. ती तिच्या मोपेडवरनं एकटीच चालली होती. मध्येच अंधार असलेला एक सुनसान भाग आला. तिला मोपेडच्या आरशात दिसलं, पाठीमागं कुणीतरी बसलं आहे. ती दचकली. थांबावं तर तो भाग सुनसान. आजूबाजूला फारशी वर्दळ नाही. तिनं गाडीचा वेग वाढवला. थोडं पुढं जाऊन मेन रोडवर आली. मग तिनं मागं वळून बघितलं तर तिथं कुणीच नव्हतं.
हा काय प्रकार होता? भास? की आणखी कांही?
जेऊन घरी परत आल्यावर तिनं whats app चालू केलं. काकांचा मेसेज होता, ‘रात्री असं कुठं भटकत जाऊ नकोस पोरी... उगीच तुला कांहीतरी भास व्हायचे आणि तू घाबरायचीस.
पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2015/12/blog-post.html

सलोनी राठोड
सलोनीने कॉम्प्यूटर कांही बंद केला नाही, ती तिच्याच नादात होती. मी तिला हाक मारली,
‘सलोनी बेटा, कौन सा गेम खेल रही हो?’
‘मैं गेम नहीं खेलती’ तिने माझ्याकडे न बघता उत्तर दिले.
‘फिर क्या कर रही हो?’
‘मैं एक प्रोग्राम बना रही हूं’ 
तिचे हे उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले. सलोनीचे वय फार तर सात  वर्षे असावे. या वयात ही प्रोग्राम बनवते? खात्री करून घेण्यासाठी मी विचारले, ‘तुम कौनसी क्लास में पढती हो?’
‘सेवंथ स्टॅंडर्ड’ तिने उत्तर दिले.
तिच्या या उत्तराने मला आश्चर्याचा धक्का बसला. असे कसे शक्य आहे? की ही मुलगी तिच्या वयापेक्षा छोटी दिसते?
‘तुम्हारी उम्र सात साल है ना?’
‘हां....’
‘फिर तुम सेवंथ स्टॅंडर्ड में कैसे?’
पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2014/05/blog-post_17.html

व्हर्च्युअल डॉटर
दुपारी पाटील साहेब ऑफिसला गेले. ते ऑफिसमध्ये पोहचतात न पोहचतात तो पर्यंत त्यांना मॅडमचा फोन आला, ‘अहो, तुम्ही ताबोडतोब घरी या’. आवाज घाबरलेला.
‘आता काय झाले? ती परत आलीय का?’
‘नाही! पण मला भीती वाटतेय. एक विचित्र गोष्ट घडलीय..’
‘काय झालं?’
तुम्ही घरी या, सांगते’
पाटील साहेब थोड्याच वेळात घरी आले. मॅडमचा भेदरलेला चेहरा पाहून म्हणाले, ‘काय झालं?’
‘काल दुपारी तिनं फ्रीजमधलं एक चॉकलेट घेतलं होतं. मगाशी माझ्या लक्षात आलं, फ्रीजमध्ये एक चॉकलेट कमी आहे ते. ती मुलगी म्हणजे भास असेल तर मग चॉकलेट कमी कसं होईल?’
पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2015/08/blog-post.html

कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स
ताराने आपली माहिती सांगितल्यावर आता शेवटची मुलगी उभी राहिली.
‘आय एम रीटा डिसोझा फ्रॉम मेंगलोर. मी जादूगार आहे. मी क्षणात गायब होवू शकते, दुस-यांना गायब करू शकते. मी काडेपेटीतल्या काडीपासून ते आख्खी रेल्वे देखील गायब करू शकते. गरज पडल्यास मी ब्लॅक मॅजिकचा वापर देखील करू शकते’. 
पुढे वाचा: http://mahaakatha.blogspot.in/2014/06/blog-post_22.html