msanglikar

ब्लड रिलेशन्स
« on: March 28, 2016, 02:45:02 PM »
मग रुपालीनं मस्तपैकी झोप काढली. त्या झोपेत तिला एक विचित्र स्वप्न पडलं. आपण एका हॉस्पिटलमध्ये आहोत... आपल्या बेडजवळ दोन नर्स आणि चार-पाच डॉक्टर्स उभे आहेत. ते डॉक्टर्स कसली तरी चर्चा करत आहेत. अधूनमधून तिच्याकडं बघत आहेत.

तिला अचानक जाग आली. आता तिला जरा बरं वाटत होतं, ताप उतरला होता आणि अंगदुखी, डोकेदुखी बंद झाली होती. पण ते स्वप्न.... असलं विचित्र स्वप्न तिला पहिल्यांदाच पडलं होतं. असलं स्वप्न पडणं कांही चांगलं नाही, तिला वाटलं.

मीनलनं तिच्या कपाळाला, गळ्याला हात लावून पाहिला. विचारलं, आता कसं वाटतंय?
‘मी ठीक आहे आता... पण मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं’ असं म्हणत रुपालीनं  तिला पडलेलं स्वप्न सांगितलं. म्हणाली, कांहीतरी विचित्र घडणार आहे माझ्या बाबतीत. मला भिती वाटतेय.
‘तसं कांही नसतं. तू झोपायच्या आधी मी तुला डॉक्टरकडं जाऊया म्हणाले होते ना? म्हणून तुला तसलं स्वप्न पडलं असेल. विसरून जा ते.’

मग त्या दोघी स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. नेहमीचं साधं जेवण. चपाती, भाजी, भात आणि वरण. जेवण झाल्यावर दोघी थोडावेळ बाहेर फिरून आल्या.

रुपाली ते स्वप्न विसरून गेली, पण रात्री झोपल्यावर रूपालीला आणखी एक स्वप्न पडलं. ती तिच्या कामासाठी तिच्या टू व्हीलरवरनं वेगानं चाललीय आणि एका भरधाव कारनं तिला पाठीमागनं जोरात धडक दिली. ती दूर फेकली गेली. लोक गोळा झाले. कांही जणांनी तिला उचललं आणि ज्या कारनं तिला उडवलं होतं तिच्यातच ठेवलं. कार सुसाट वेगानं निघाली. थोड्याच वेळात एका हॉस्पिटलजवळ पोहोचली.

या स्वप्नानं रुपाली दचकून उठली. ही गोष्ट आत्ताच मीनलला  सांगायला नको, उगीच कशाला तिची झोपमोड करायची असा तिनं विचार केला.

दुपारी झोपले होते तेंव्हा ते स्वप्न, आता हे स्वप्नं..... परत आणखी एखादं विचित्र स्वप्न पडायचं आता झोपले तर,  असा विचार करत तिनं एक पुस्तक वाचायला घेतलं. पण तिचं पुस्तक वाचण्याकडं कांही लक्ष लागलं नाही.  तिच्या डोळ्यापुढं त्या दोन्ही स्वप्नातली दृश्यं तरंगत होती. या दोन्ही स्वप्नांचा एकमेकांशी संबंध आहे हे नक्की.

पूर्ण कथा पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2016/03/blog-post_28.html