msanglikar

गूढकथा: द ओल्ड मॅन
« on: April 26, 2016, 08:34:25 PM »
एके दिवशी एक खूपच वयस्क गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांच वय 90 वर्षं तरी असावं. त्यांची पांढरी दाढी छातीपर्यंत वाढली होती. भुवयांचे पांढरे केस डोळ्यांवर आले होते.  त्यांचे कान मोठे, प्रश्नचिन्हासारखा कर्व्ह असणारे आणि थोडे बाहेर आलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होतं. हे नक्कीच कोणीतरी आध्यात्मिक महापुरुष असावेत. माझ्याकडं का बरं आले असावेत?

मी त्यांना समोरच्या खुर्चीत बसवलं आणि म्हणालो, ‘बोला आजोबा, मी तुमची काय सेवा करू?’
ते म्हणाले, ‘एक सल्ला घ्यायचा होता.... मला कोणतं करीअर चांगलं राहील हे विचारायचं होतं’

आधी मला हसू आलं. या वयात देखील करीअर करण्याची इच्छा? पण मी लगेच सावध झालो. यांचं माझ्याकडं यायचं हे कारण नक्कीच नव्हतं. तरीही मी त्यांना म्हणालो, ‘आजोबा, तुमची जन्मतारीख सांगा’
‘थांब, आधी मी तुझी फी देतो’ असं म्हणत त्यांनी माझ्यापुढं टेबलावर एक पाकीट ठेवलं. मग म्हणाले, ‘माझी जन्म तारीख 11 नोव्हेंबर 1820 आहे’
‘आं....’ मी आश्चर्यानं म्हणालो, ‘तुमचा जन्म 1820 साली झाला? ... वाटत नाही... मला वाटलं तुम्ही 1925 च्या आसपास जन्मला असाल’
‘नाही... माझा जन्म 1820 सालीच झाला... मला चांगलं आठवतंय’
‘ठीक आहे,’ असं म्हणून मी मनातल्या मनात त्या तारखेची गणिते मांडू लागलो.

11.11.1820. अरे बाप रे! या 1820 मधल्या अंकाची बेरीजसुद्धा 11 येते. 11.11.11. जन्मतारखेत 3 वेळा मास्टर नंबर 11! शिवाय पूर्ण बेरीज 33! आणखी एक मास्टर नंबर. ही कोणीतरी फार मोठी ‘स्पिरिच्युअल’ व्यक्ति दिसते. चेहऱ्यावरनं तर आपण आधीच ते ओळखलंय, त्यांची जन्मतारीख देखील ते कन्फर्म करतेय. आता 2016 चालू आहे. 196 वर्षं वय? ते हिमालयात अनेक शतकं जगणारे साधू असतात त्यांच्यापैकी दिसतंय कुणीतरी. नक्कीच.

पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2016/04/blog-post.html