msanglikar

टीना की कहानी
« on: December 13, 2016, 10:54:35 PM »
-महावीर सांगलीकर

मी एका whats app ग्रुपची मेम्बर्स लिस्ट चेक करत होतो तेंव्हा त्या लिस्ट मधल्या ~Teena या नावावर माझी नजर थबकली.  कोण असावी बरं ही? नावावरनं तरी लहान मुलगी वाटते. लहान म्हणजे शाळा-कॉलेजमधली. पण कांही सांगता येत नाही. मी तरुण असताना माझ्या ओळखीची टीना नावाची एक छोटी मुलगी होती. त्यावेळी मी एक फोटोग्राफर होतो आणि त्या टीनाचा   एक सुंदर फोटो काढला होता. तो तिच्या आई-वडिलांना एवढा आवडला होता की त्यांनी तो मोठा करून घेतला आणि फ्रेम करून घरी लावला. पुढं ती टीना माझ्या डोळ्यासमोरच तरुण झाली, तिचं लग्न झालं आणि ती सासरीही गेली. तिला आता मुलंही झालीत. सांगायचा मुद्दा म्हणजे वयस्कर बायकांचं नावही टीना असू शकतं. म्हणजे ही whats app टीना लहान असू शकते किंवा मोठीही असू शकते.

मी सहसा आपणहून कुणाला मेसेज पाठवत नाही. चॅटिंगचा तर प्रश्नच नाही. पण कांही वेळा मेसेज पाठवनं माझ्याकडनं आपोआपच घडून जातं. त्यामागं कांही हेतू नसतो. वाटलं म्हणून पाठवला, असं होतं. मग चॅटिंगही सुरू होतं. असो.

मी टीनाला एक मेसेज पाठवला, जय जिनेन्द्र!
थोड्याच वेळात टीनाचं उत्तर आलं, जय जिनेन्द्र! व्हू इज धिस?
‘महावीर सांगलीकर’
‘ओह... बोलिये सर’
वेल! म्हणजे ती मला ओळखत होती. प्रत्यक्षात नसलं तरी नावानंतरी. पण यात कांही विशेष नव्हतं. म्हणजे मी प्रसिद्ध आहे म्हणून नाही, तर तिनं माझ्या पोस्ट्स त्या ग्रुपमध्ये वाचल्या असतील म्हणून.
‘कुछ नहीं... ऐसे ही मेसेज किया’ मी तिला उत्तर दिलं.

एव्हाना तिचा डी.पी. दिसू लागला होता. ती एखादी कॉलेज कुमारी नव्हे तर एक मध्यमवयीन बाई होती. तिच्या चेहऱ्यावरनं मी लगेच ओळखलं, शी इज अ जिनिअस लेडी! मी हे पण ओळखलं की तिचा जन्मांक 8 असणार. जन्मतारीख 8, 17 किंवा 26 पैकी एखादी, पण शक्यतो 8च. हे असं ओळखणं मला अलीकडं खूपच सोपं जातं. म्हणजे त्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही, एका क्षणातच कळतं. क्वचित कधीतरी अंदाज चुकतो. पण हवामान खात्याच्या अंदाजाइतकी चूक होत नाही.

एवढ्यात टीनाचा मेसेज आला,
‘सर आप न्यूमरॉलॉजिस्ट है ना?’
‘येस’
‘मेरा बताईये ना!’
‘क्या बताऊं?
‘न्यूमरॉलॉजी’
‘ओके. गिव्ह युवर डेट ऑफ बर्थ’
‘8 ऑगस्ट’
अरे बापरे! आपण अंदाज केला आणि हिची जन्मतारीख खरंच 8 निघाली! जन्म महिनाही आठवा. लगेच मला जाणवलं, हिची माझी चांगलीच मैत्री जमणार आहे.
मी तिला सांगितलं, ‘देखो टीना, यू आर मटेरिअली अ व्हेरी सक्सेसफुल लेडी. यू आर अ रिच अँड युवर लाईफ स्टाईल इज रॉयल. यू आर स्पिरिच्युअल अँड ह्युमॅनेटेरीअन. स्पिरिच्युअली अँड मटेरिअली यू आर व्हेरी हॅप्पी. बट....’
‘बट व्हॉट?’
‘यू आर नॉट सो हॅप्पी इन युवर फॅमिली लाईफ...’
‘और...?’
‘और प्रॉबेबली यू आर वर्किंग इन अ फिल्ड रिलेटेड टू इंटलेक्ट... लाईक एज्युकेशनल etc. ’
‘सर, मुझे लगता है आपने मेरे बारे में पहले ही किसी से पूछ रखा है!’
‘नहीं टीना जी.... मुझे किसी के बारे में पुछना नहीं पडता. मेरे लिये किसी की  डेट ऑफ बर्थ ही काफी होती है, उसके बारे में जानने के लिये . तुम्हारी केस में तो मेरे सामने डेट ऑफ बर्थ के साथ साथ तुम्हारा चेहरा भी हाजीर है’
‘सर आपने मेरे बारे में जो कुछ कहा वह लगभग सब सच है. लेकिन सर एक बात मेरी समझ में नहीं आयी...’

पूर्ण कथा पुढे वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2016/12/blog-post.html