anagha

vir saverker-article
« on: January 15, 2014, 09:29:03 AM »
 स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - स्वातंत्र्यवीर सावरकर

“धगधगत्या ज्वाला पेटवून ह्र्दयात,
स्वातंत्र्य चे स्वप्न पाहिले क्रांतिविरांनी त्यात ,
कितीएक प्राणाच्या आहुत्या पडल्या ,
त्या स्वातंत्र्याच्या महासंग्रात ”

ब्रिटीशांच्या तावडीतून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणपणाने लढा दिला, त्या क्रांतिवीरची नावे किती घेणार ?
मंगल पांडे, गांधीजींना सत्य, अहिंसा, प्रेम मार्गें स्वातंत्र हवे होते .
ते देशाचे बापूजी होते. बाल गंगाधर टिळक, हे जहाल मतवादी होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच अशी त्यांची प्रतिज्ञा होती .
“जे देशासाठी लढले ते देशद्रोही ठरले
जहाल मतवादी कट्टर विरोधक ,टिकास्त्र येत असे, केसरी -मराठा वृत्तपत्रातुन ,
जन जागृती केली, शिवजयंती ,गणेश उत्साहातून, तेच टिळक ठरले असंतोषाचे जनक
देशद्रोही ठरवुनी टाकले ,ब्रिटिशांनी मंडालेच्या तुरुंगात ,लिहला गीता रहस्य हा ग्रंथ ”
शेवटच्या श्वास ही देशासाठी दिला. भगतसिंह, राजगुरू, हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले. खुदिराम बोस, तात्या टोपे, मादाम कामा, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, इत्यादी लोकांनी देशासाठी प्राण पणाला लावले .
“प्राणाची पर्वा नसे, घरदार ,संसार ,उध्वस्त झाले ,
मनखच्ची करून ,कोलू ओढून हात रक्तबंबाळ झाले ,
तेलात मिसळे रक्त क्रांतिवीरांचे ,
(सावरकर) मानाने खंबीर राहून, चेहऱ्यावर मात्र हास्य असे,
मनात मात्र स्वातंत्र्यासाठी अग्नीच्या ज्वाला भडके ,
किती एक लेख, कविता ब्रिटिशाविरुद्ध,
जनजागृती ते गुपचूप करित, पुरवीत ते देश विदेशात ,
देशच्या स्वातंत्र्या साठी दिली आहुती प्राणाची त्यांनी ”
असे हे स्वातंत्र्य वीर सावरकर , त्यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर . त्यांचा जन्म २८ मे १८८३, नाशिक जवळील भगूर या गावी झाला. त्यांचे वडील दामोदर पंत विद्वान, स्वाभिमानी व करारी स्वभावाचे तर आई राधाबाई धार्मिक व सात्विक वृतीच्या गृहिणी होत्या. त्यांना दोन भाऊ व एक बहिण होती .
आई राधाबाई, मुलांना लहानपणी शिवाजी महाराज, राणाप्रताप, पेशवे यांच्या गोष्टी सांगत. त्यामुळे त्या मुलांचे मनोबल विकसित झाले. स्वा.सावरकर तल्लक बुद्धीचे होते . मित्रांना जमवून अभ्यास बरोबर व्यायाम व शस्त्र चालवणे, कुस्ती करणे हे खेळ खेळत. शाळेत असल्या पासूनच त्यांचे लेख वृत्तपत्रात येत . त्यांचे धीट विचार व अफाट ज्ञान पाहून परीक्षक चकित होत . त्यांनी देशभक्तीपर कविता व पोवाडे रचले . त्यांनी मित्रांनमध्ये राष्ट्रभक्ती जागृत केली . तरुणांची फौजच त्यांनी उभी केली . देशभक्तीची मुळे मित्रांच्या मनात रुजवली. ते कोणतेही जाती, भेद मनात नसत .
मा. लोकमान्य टिळक ह्यांनी त्यांचे कौतुक केले . देशप्रेम व देशाच्या स्वातंत्रासाठी त्याग करायची तयारी , त्यांची देशभक्तीपर गीते व कविता वाचून टिळकांनी त्यांची पाठ थोपटली .
सावरकरांची देशभक्तीपर हेलावून टाकणारी भाषणे , ऎकुन देशच्या स्वातंत्र्यासाठी उडी घेण्यासाठी तरूणांची मने पेटून उठू लागली . त्यांनी व कॉलेजच्या मुलांनी " साप्ताहिक " सुरु केले . त्यात ते देशभक्तीपर विचारांचे लेख लिहित. शि.म. परांजपे यांचे "काळ " या वृत्तपत्रातून येणारे क्रांतिकारी विचार सावरकरांना कार्य पुढे नेण्यास मदत करीत .
सावरकर व त्यांचा मित्रांनी परदेशी इंग्रेजी मालावर व कपड्यांवर बहिष्कार टाकला व प्रथमच पुण्यात परदेशी कापडाची होळी पेटवली . इंग्रजांन विरुध्द असंतोषाची लाट पसरली . इंग्रज सरकारनी त्यांना दंडाची शिक्षा सुनावली .
त्यांनी अभिनव भारत ही संस्था स्थापली . शांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला पुढे ते लंडन येथे कायद्याच्या अभ्यासासाठी गले . तेथेही भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत मिळवणे, प्रचार करणे, जीवाचा त्याग करणारे स्वातंत्र्य प्रेमी मिळवणे ,प्रचार करणे इत्यादी चालूच होते. तेथे पं.श्यामजी कृष्णा वर्मा यांनी शिष्यवृत्ती दिली व इंग्रजांकडे काम करायचे नाही ; ही अट घातली . सावरकराना तेच हवे होते. लंडनला ते इंडिया हाउस मध्ये उतरले .तेथे त्यांनी फ्री इंडिया सोसायटी नावाची संस्था सुरु केली .
तेथे भारतीय लोकांची संघटना तयार करून देशभक्तीला मजबूती दिली . त्यांना तेथे अनेक अनुयायी मिळाले .या मध्ये लाला हरदयाळ, भाई परमानंद, मादाम कामा, सेनापती बापट ,मदनलाल धिंग्रा अशी कितीतरी मंडळी होती . भारतात इंग्रज लोक ,लोकांना कसे छळतात ,हे ते सांगत तेथे फ्री इंडिया संथा शिवाजी महाराज ,गुरुनानक , गुरुगोविंद सिंह यांचे स्मृतिदिन साजरे करीत. दसराचा उत्सव साजरा करीत आशी ही संघटना भक्कम झाली.
पुस्तके, पत्रिका ,लेख ,देशभक्ती ,मासिके इत्यादी चा प्रभाव पडला. देशभक्तीचे जहाल विचार व ज्वलंत देशभक्ती याने लोकांची मने जिंकून घेतली. त्यामुळे इंग्रज सरकार चिडले, १८५७ च्या स्वातंत्र्य प्रेमींना बंडखोर ठरवले . त्यांचा स्मृतिदिन लंडन मध्ये मोठ्या अभिमानाने साजरा केला. सावरकरानी १८५७ चा स्वातंत्र संग्राम हा ग्रंथ लिहला .त्या मुळे खरा इतिहास लोकांना कळला व इंग्रजांची चीड आली. भारतात काय घडते हे अमेरिकेतील नियत कालिकात प्रसिद्ध झाले, त्यामुळे परदेशी जनतेची सहानुभूती भारताला मिळू लागली .
काही भारतीय क्रांतीकारक स्फोटक द्रव्ये जमवून; गुप्तपणे ठराविक ठिकाणी पाठवणी करण्यात गुंतले होते. पुस्तकामध्ये पिस्तुले लपवून ती गुपचुपपणे भारतात पाठवीत होते. कर्झन वायलीने बंगालच्या फाळणीच्या वेळी भयंकर अत्याचार केले म्हणून मदन धिंग्रांनी लंडनमध्ये कर्झनचा गोळ्या घालून त्याचा खून केला. त्यांना त्यामुळे फासावर जावे लागलें. इकडे भारतात सावरकरांच्या कुटुंबियांचा इंग्रज सरकारने छळ सुरु केला. बाबा सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. इंग्रजांच्या विरोधाला न जुमानता भारतीय प्रतिनिधीनी जर्मनीत प्रथमच आपला राष्ट्रध्वज फडकवला व जगातील स्वातंत्र प्रेमींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. इंग्रजांनी सावरकरांना लंडन येथे पकडले. ते लंडन येथून कडेकोट बंदोबस्तात निघाले . मृत्यूची टांगती तलवार असतांनाही ते मोकळे पणाने हसत बोलत होते. मनात मात्र तेथून कसे निसटून जाता येईल याचेच विचार करत होते. बोट मुंबई बंदरात आली, करोडोच्या संख्याने लोक जमा होते . सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. बेड्या ठोकलेल्या स्थितीत, तलवारी ,बंदूक धारी शिपायांचा कडेकोट बंदोबस्तात चेहेरावर मात्र हास्य होते . लोकांना प्रेरणा देणाऱ्या सावरकरांना ब्रिटीशांनी बंद मोटारीतून नाशिकचा तुरुंगात आणले व तेथे त्यांचा विरुध्द खटला सुरु झाला . त्यांना अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा झाली . तेथे कैद्यांचे फार हाल करत . अंदमानचा तुरुंगात त्यांनी फार हाल अपेष्टा सहन केल्या . तेलाचा घाण्याला जुंपून तेल काढावे लागे ,त्या तेलात रक्त मिसळे क्रांतीवीरांचे ,प्राणाची पर्वा नसे ,घरदार संसार उधवस्त झाले होते .
बोटीत तांत्रिक बिघाड झाला, याचा फायदा घेऊन ते, संडास मध्ये गेले व चपळ पणे वरचे पोर्ट होल पकडले व त्या लहानश्या छिद्रातून समुद्रात उडी टाकली.
" ने मजसीने परत मातृभूमीला ,सागरा प्राण तळमळला”
परकियांच्या गुलामगिरीत बळजबरीने जखडून ठेवलेल्या आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी मला गेलेच पहिजे, हे सागरा मला मदत कर, त्वरेने मला मातृभूमी कडे परत ने. पहारेकरी सावध झाले, बंदुकीच्या गोळ्या चालूच होत्या पण त्यातूनही ते मार्ग काढत किनारी आले पण गोऱ्या शिपायांनी त्यांना पकडून बोटीवर आणले . देशप्रेमा मुळे त्यांचा हा धाडसी , पराक्रमी प्रयत्न जगभर गाजला .
तेथे ही सावरकरांनी खूनी, भयानक कैद्यांची मने वळवली .त्यांच्याशी मैत्री केली . साक्षरते चे शिक्षण कैद्यांना दिली, पुस्तके वाचायला दिली, सुधारले ते तुरुंगात. सावरकर खंबीर मनाचे ,नाहीजुमानले विरोधाला त्यांची ढासळणारी प्रकृती ,देशाभिमान हे सर्वच देशातील गोरगरीब जनतेला ,विचारवंत यांना ,लोकहितवादि यांना दिसत होते . द्या सोडून राजकीय कैद्यांना , अशी मागणी ते करू लागले .इंग्रजांची नाचक्की होत होती.
कितीतरी अटी इंग्रजांनी घ्यातल्या ,राजकीय कैद्यांची त्या नरकापूरीतून सुटका केली . घरदार संसार उध्वस्त ,प्रकृतीची साथ नाही ,तरी त्यांनी आपले समाज कार्य चालू ठेवले .
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्योत्तर काळात सावरकरानी फार मोठी कामगिरी केली आहे. आताच्या नव्या पिढीला जर पुंर्व इतिहास माहितच नसेल तर कोण टिळक ,कोण आगरकर ,कोण सावरकर आम्हाला नाही माहीत . असो.
१९४७ ब्रिटीश लोकांना भारत सोडून जावेच लागले पण त्या वेळी देशाचे विभाजन झाले . असे देशाचे विभाजन कोणासही मान्य नव्हते. कांग्रेसचे अनेक नेते सावरकरांच्या गुप्त सोसायटी ,अभिनव भारत यांचे सदस्य होते. १९५२ मध्ये मे १० -११ ला पुण्यात क्रांतिकारक सोसायटी बरखास्त करण्यात आली . १८५७ ते १९४७ ह्या काळात ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली त्या सर्वाचे फोटो प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते . त्यावेळी केशवराव जेडे हे मुख्य होते . सावरकरानी आपले पहिले भाषण हुतात्मावरदिले. त्याच दिवशी संध्याकाळी पेशवे पार्क पुणे येथे सुभाषचन्द्र बोसे ह्यांचे मोठे चित्र लावण्यात आले होते .ही मिटिंग सेनापती बापट यांनी आयोजित केली होती . सावरकर ह्यांनी ,त्या भाषणात भारत स्वतंत्र होण्यासाठी इग्रजांवर कशी सक्ती केली हे सांगितले . त्यांनी क्रांतिकारकांचे महत्व पटवून दिले . १२ मे १९५२ ला सावरकरांनी बाबुराव सनस यांना महापौर केले व नागरी हक्क दिले . त्या वेळी पुणे शहर महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते . १९६१ मध्ये महाराष्ट्र शासनाचे वित्त मंत्री झाले . १४ मे रोजी सावरकरांनी केसरी ,मराठा वृत्त पत्रे जे टिळकांनी चालू केले होते त्या सर्वांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी सगळे उपस्थित होते .
१९५२ मध्ये त्यांची प्रसिद्ध व्याख्याने भारतीय इतिहासाची सहा वैभवशाली भाषणे वितरीत करण्यात आली . ८५ वे भाषण वितरीत करतांना भाऊराव अहिरे हे महसूल मंत्री उपस्थित होते.
१९५४ भारताचे पहले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ह्यांनी अंदमान बेटाला भेट दिली, त्या वेळी त्यांना सावरकरांनी सोसलेल्या हाल अपेष्टांची आठवण होऊन ते गहिवरले व ते नतमस्तक झाले .
१९५६ लोकमान्य टिळक जन्म शताब्दी सोहळ्या निमित्त सर्व पक्षांनी एक समिती स्थापन केली. हा उत्सव प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा येथे आयोजित करण्यात आला होता . त्या वेळी सावरकर मुख्य अतिथी होते व तेंचे त्या वेळी भाषण झाले . देश प्रबळ व शक्तीमान झाला पाहिजे . त्यांनी त्या वेळी टिळकांच्या कामगिरी वर प्रकाश टाकला .
१९५७ , १२ मे दिल्ली नागरिकांनी इंग्रजपूर्व भारत कंपनी नियामाविरुघ्द १८५७ ला झालेले युद्धाचा शताब्दी सोहळा साजरा केला ,त्या वेळी मुख्य अतिथी सावरकर होते. त्याच संध्याकाळी महाराष्ट्र समाज मध्ये त्यांचे भाषण होते . १९५८ मध्ये सावरकरा चा ७५ वा वाढदिवस साजरा केला त्यांना ११००१ रु मुंबई महापौरांनी दिले .
१९६०-६१ उत्साही सावरकर अजूनही जिवंत होते ,त्या मुळे भारत अखंड राहिला . सावरकराची तब्येत खालावली होती .
ते फक्त १४ जानेवारी १९६१ रोजी पुण्यातील एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते . त्या वेळी बरेच नेते उपस्थित होते .
सावरकर म्हणाले ,मी हळू बोलत आहे ,मी फक्त दोन मिनटेच बोलीन माझ्या पोटात दुखायला लागेल . पण काय आश्चर्य दोन मिनिटानंतर त्यांच्या आवाजात बदल झाला व त्यांना फार मोठी ताकद ,उर्जा मिळाली होती . हा फार मोठा बदल होता . देशासाठी मजबूत सशस्त्र सेना असावी असे ते म्हणाले . ऑडियो टेप मध्ये मराठी भाषा जरी समजली नाही ,तरी त्यांच्या आवाजातील लक्षणीय बदल लक्षात येतो . १९६२ -६४ नेहरू स्वर्गवासी झाले .ऑक्टोंबर मध्ये भारत सरकारने ब्रिटीश नियमा विरुद्ध भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सहभाग स्वीकारून त्यांना पेन्शन मंजूर केली .
२६ फेब्रुवारी १९६६ साली ह्या थोर देश्भाक्ताचा अंत झाला .
“झुंजले ते भवितव्याची पन्नास वर्ष,
झाला देश स्वतंत्र ,
संपले आता कार्य आपले ,वर्ज केले अन्न ,
नुसते पाण्यावर ते रहिले ।
आनंदाने कवटाळले मृत्यूला ,
उभा देश हळहळला
दिवस तो २६ फेब्रुवारी १९६६ चा होता ”
एक महान देशभक्त अस्ताला गेला होता .
१९७० साली त्यांच्या सम्मानार्थ इंदिरा गांधी सरकारने त्यांचे पोस्टल तिकीट काढले . त्या नंतर त्यांचे कार्य पुढील पिढीला पण समझावे म्हणून बऱ्याच संन्था पुढे सरसावल्या . त्यांनी भारतीय जनते साठी चाळीसहून अधिक पुस्तके लिहिली. कमला , माझी जन्मठेप इत्यादी पुस्तके , आत्मबल , जयास्तुते , सागरास, ने माजासी ने इत्यादी काव्ये लिहिली . त्यांनी संन्यस्त खडग नावाचे नाटक लिहले. अशी बरीच नाटके प्रसिद्ध होती .
ते तरुणांना सांगत आधुनिक विचार अंगी बाणा ,विज्ञानाची कास धरा . देशाची प्रगती करा . देशाचे श्रेष्ठत्व सिद्ध करा . जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले ,ते देशातील लोकांना सांगत ,देश प्रबळ व शक्तिमान करा ,आपासातले मतभेद विसरा . ते अंधश्रध्दे विरुध्द होते.
स्वातंत्र्य वीर सावरकर एक महान पर्व ,ते भारतीयांना सदैव प्रेरणा ,स्फूर्ती देत राहतील. विस्मृतीत ते जाणार नाही . त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही . प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे . असे देशभक्त होते म्हणूनच आज आपण सुखात आहोत . याची जाणीव प्रत्येकाला हवी . म्हणून तरुणानो देशाचा विकास झपाट्याने करा .
धन्यवाद ,त्या स्वातंत्र विराला ,क्रांतिवीरांना , देशभक्तांना जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले . त्रिवार वंदन त्या भू मातेला .
भारत माता की जय
धन्यवाद
अनघा .