|| प्राणांजली || -:(लेख):-
« on: October 16, 2011, 10:02:50 PM »
                                                                                             
       अगदी काहीच दिव्संपुर्विची गोष्ट आहे मी Private Enggचा  Hardware & Networking कोर्स  करत होतो. शैक्षणिक वर्षात अनेक मित्र मैत्रिणी होत्या. नेहमीच आमच्यात वातावरण एकदम हसत खेळत असे, टिंगल मस्करी नेहमीच व्हायची पण हा हसी मजाक कोणाच्या जीवावर बेतेल याची कल्पना सुधा नव्हती.
       "प्रणाली", एक मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती, इत क्षेत्रात रस असल्या कारणाने आज ती आमच्यात होती. १२वीत  ६९% घेऊन पास झालेली प्रणाली स्वभावाने अतिशय मनमिळाऊ  होती अण तितकीच रागीटहि होती पण तो राग मात्र क्षणभंगुर असायचा म्हणून जवळ जवळ ती सगळ्यांचीच लाडकी होती.
       IT क्षेत्र म्हणालो तर नेहमीच आमच्यात माहितीचे आदान प्रदान होतच असे. Knowlage वरून वाद तर हमखास असत. सर्व चांगल्या घराण्यातील मुले आमच्यात होती Data Shairing,Software's, Update अशा अनेकविध Dataच shairing  pen drive थ्रु होतच असे. एका Software विषयी अनेकदिवस चर्चा चालू होती आमच्यात, एकाने ते उत्साहाने घेतल सुद्धा. नेहमी प्रमाणे वाटपाचे काम सुरु झाले. पण एकाने टिंगल म्हणून त्यात ट्रोजन नाविक Vairus ची File link केली. प्रणालीने  पैसे साठून एक जुनाच  PC विकत घेतला होता. त्या Software ची मागणी तिने केली असता तिला ते Normaly.देण्यात आल. इतर कुणाला Link केलेल्या Fileची कल्पनाही नव्हती. Trojanने तिच्या PCमध्ये धाव घेतला.
       Trojan नाविक Vairus हा PC haikingमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला  जातो. प्रणालीला ते Softwair दिल ह्याची Linkकर्त्याला पूर्ण कल्पना होती, त्याच्या टिंगलीचे  हव्यासात रुपांतर झाले, त्याच्या विचारांत अचानकच बदल झाला. त्याने Trojanद्वारे प्रणालीच्या वेब कैम्पचा  अचूक वेध घेतला, ती राहत असलेल्या १०X१० च्या खोलीत  जे जे काही करत होती ते त्याने Record करून घेतल आणि त्याची CD बनून ती अनेक ठिकाणी लावण्यात आली . ह्या गोष्टीची त्याच्याव्यतिरिक्त कोणालाच कल्पना नव्हती .
        काहीच दिवसांत कोर्स Complit झाला. प्रणाली Vipro नाविक एका कंपनीत Intrviue साठी गेली असता "आम्ही Carectarless मुलीना Job.देत नाही " ह्या शब्दांत तिचा अपमान झाला जाब विचारला असता Intarnet वरील  व्हिडीओ दाखवण्यात आला ती क्षणातच स्तब्द झाली. त्या गोष्टीचा स्वतःला खूप त्रास करून घेतला तिने, नेहमीच रडत असायची, हि गोष्ट तिच्या घरच्यांना सुद्धा कळली आम्ही मित्रांनी आणि तिच्या घरच्यांनी  तिला ह्या सर्वातून सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण एकांताची वेळ साधून तिने झालेल्या अपमानाकडून हार मानून गळफास लाऊन घेतला व ह्या जुलमी  जगाचा कायमचा निरोप घेतला. त्या अखेरच्या क्षणी सुद्धा तिने लिंक केलेली File ची CD तोडून हातात घट्ट पकडली होती.
      तिच्या आयुष्यावर  झालेल्या आवहेलणांची  शिक्षा तर त्या नराधमाला मिळाली पण त्या दिवशी फासावर लटकली तिच्या आई वडिलांनी पाहिलेली  तिच्यासाठीची अपूर्ण स्वप्न, छोट्या भावंडांचे भविष्य आणि आम्हा मित्रमंडळींची  जीव कि प्राण असलेली सर्वांची लाडकी प्रणाली  !!!!
      मित्रानो विज्ञान आणि तंत्रज्ञान हे शाप कि वरदान ह्या प्रश्नच उत्तर आजवर जरी मिळाल नसल तरी कोणती  गोष्ट आपल्यासाठी वरदान व दुसर्यासाठी शाप ठरू शकते ह्याचे मूल्यमापन करण्या इतके आपण सार्वजन नक्कीच सुज्ञ आहोत.

धन्यवाद !!

-कविकुमार