Chota Kavi

Marathi Bodh Katha
« on: August 08, 2012, 10:17:38 AM »
मरण :- चल .... आज तुझा नंबर आहे !!
मुलगा :- काय ?? ... पण... पण मी अजून तयार नाही मरायला.
मरण :- लिस्ट मध्ये पुढचे नाव तुझेच आहे, त्याला मी काही नाही करू शकत !!

मुलगा :- ओके .... आता तू आलास तर येणा घरात, बस, मी तुला खायला आणतो काहीतरी. ( असे म्हणून मुलाने झोपेचे औषध घातलेल अन्न त्याला खायला दिले .... त्यावर मरण झोपून गेल.
पुढे मुलाने हळूच त्या लिस्ट मधील आपले पहिले नाव काढले व शेवटी लिहिले. त्यावर मरण जागे झाल.)

मरण :- तू माझ्याशी चांगला वागलास म्हणून मी आता लिस्टच्या शेवटापासून सुरुवात करतो ........ असे म्हणून मरण त्या मुलाला घेऊन गेलंच !!!!!!

तात्पर्य :- मरण कधीच कोणाला चुकत नाही आणि कोणीच ते लांबवू सुद्धा शकत नाही, म्हणून वरती गेल्यावर देवाला लागणारी फक्त आणि फक्त " प्रेमाची शिदोरी " आधीच भरभरून ठेवूयात.