Shreyash

Prem kavita
« on: August 09, 2017, 08:25:35 AM »
नकोत 'roses'
नकोय 'treat'
नको 'chocolate cadbary'
ना नकोय मला 'Teddy'.....!!!
पण गिफ्ट तर हवय मला आज ''sweety".....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवय मला......
तुझं 'सुख'......
अन त्या सुखात
पहायचीय सदा....
'सुंदर मुखडा' अन 'दिलकश smile' ची जोडी.....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवी आहेस मला तू......
यशाच्या उंचच उंच शिखरावर खडी......!!!
पहायचय मला......
तुझी झालेली सारी स्वप्न पूरी......
अन त्या स्वप्नात माझ्यासाठी जागा थोडी.....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवय मला...,
'आनंदी दीर्घायुष्य' तुझं.....
पहायचीय मला.....
तुझी 'उंचच उंच माडी'
अन 'महागडी गाडी'.....!!!
अन गाडीत फिरणा-या मालकीणीच्या 'ह्रदयातील प्रेमाची गोडी'......!!!
देशील ना गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवय मला.....
तुझं 'sucess' या जिवनी
पहायचय
"best Engineer award" घेवूनी तूला थाटात खडी....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवय मला.....
तुझं 'सुंदर दिसणं'
अन त्यापेक्षाही सुंदर
माझ्या आयुष्यात असणं.....
पहायचीय मला.....
तूला नेसलेली 'रेशमी साडी'.......
अन त्या रेशीम धाग्यांसारखीच गुंफलेली मनी 'माया वेडी'......!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवाय मला.....
तुझा 'नाजूक आवाज'
ऐकायचय.....
थोडं 'प्रेम' तुझ्या तोंडूनी.....
अन जायचय मला त्या प्रेमात चिँब चिँब न्हाउनी......!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवाय मला......
तुझा 'चांदणी मुखडा'
नकोय नुसते 'छायाचित्र'......
पहायचीय मला.....
त्यात फक्त तुझी अन 'प्रित'......
भाबडी.....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवय मला.....
तुझं ते 'रुसणं फुगनं'
पहायचाय मला.....
तुझा तो 'लटका राग'
अन रागाने लाल झालेल्या छोट्याशा नाकाची.....
'नथणी' ने वाढवलेली गोडी......!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
तुझे 'शराबी नैन'
अन हवेत गं मला ते 'मखमली केस'......
पहायचाय मला......
त्यात माझ्यासाठी माळलेला 'गजरा'.....
अन बोलायचय सारं 'face to face'.....!!!
जरी इच्छा ही या मनी 'रांगडी'......!!!
तरी देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवाय मला.....
तुझा 'निढळ विश्वास'
अन त्याच विश्वासाने भरलेला 'मोहक सहवास'......
सांगायचय मला....
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
नकोय नुसती 'सोबत?
हवीय तुझी 'अखंड साथ'.....
पहायचय मला......
इतक्याच प्रेमाने तू घेतलेला 'हातात हात'......
अन त्या हातात कधी न तुटणारी 'प्रेमाची नाजूक बेडी'.....
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.......!!!
हवय मला....
तुझ्याचसाठी जगताना 'मी'
पहायचय मला......
'तुझा श्वास' न थांबण्या जुडलेली 'माझ्या श्वासाची कडी'.....
देशील नां गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवाय मला.....
तुझ्या 'ह्रदयाच्या कोप-यातील मी'
जाणून घ्यायचय......
इतकं प्रेम असूनही
का?? कसे?? सांगेना 'एक वेडी'......!!!
देशील ना गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवय मला......
'तुझं प्रेम'
पहायचीय मला.....
तुझ्या 'खास माणसांच्या लिस्ट' मधे माझी
'जागा वरचढी'...... !!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवीय मला.....
'तुझी प्रेरणा'
हवीय तु माझ्या 'साथी'....
जगण्यासाठी,
हसण्यासाठी,
रडण्यासाठी,
भांडण्यासाठी,
मनवण्यासाठी,
लढण्यासाठी,
जिँकण्यासाठी......
अन लढताना आली कधी हार तर 'धीर देण्यासाठी'
पहायचीय
'तूझी साथ',
'तुझं प्रेम' अन 'मैत्री'....
हेच गं सांगण्या केलीय
कवीता ही
'वेडी वाकडी'.....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
तुझा.........
अन फक्त तुझाच.........
                                (श्रेनु)