virat

कष्टाचे फळ मिळाव
« on: March 25, 2015, 07:29:15 PM »
अंधारात राहून उजेडासाठी जगत असत कोणीतरी,

एखाद्याच सुख मनापासून मागत असत कोणीतरी,

कष्टाचे फळ मिळाव म्हणून् पळत असत कोणीतरी,

दिवे सगळे विझल्यानंतर जळत असत कोणीतरी,

दूरुनच एका कोण्यातून मायेने बघत असत कोणीतरी,

उगीच आपण एकटा मानतो पण,

तूमच्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी..