RAM NAKHATE

आम्ही सोनार..
« on: July 21, 2016, 01:17:44 PM »
आम्ही सोनार.....
••••••••••••••••••••••••••
मी आहे जातीचा सोनार |
देतो धातुंना सुंदर आकार ||
धातुंचे बनवतो अलंकार |
मी आहे पेशेवार सोनार ||

काम आम्ही स्वतः करतो |
त्याचा गाबा सराफ खातो ||
कामात आमची ईमानदारी |
सराफ करतो कामात चतुरी ||

कामावर आमच्या ध्यान ठेवी |
ईनाम त्यांच्या खिशात ठेवी ||
कामात आम्ही कारागीर |
आमचे नाव आहे सुवर्णकार ||

काम आमचे नाजुकीचे |
डोळा पडता गायप व्हायचे ||
चोर त्याला टोकुन पाहायचे |
काम करतो सोने-चांदीचे ||

जोखीम आमच्या कामाची |
महागडी धातु पगळायची ||
आम्ही सोनार ईमानदार |
देव आमचा नरहरी सोनार ||
               - कवी राम नखाते
            मो. नं. ९५४५०१३६७९
          मु. मांडणी, ता. अहमदपुर
                   जि. लातुर.