m4marathi Forum

मराठी चारोळ्या (Marathi Charolya) => प्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya) => Topic started by: pallvi on October 21, 2016, 01:41:02 PM

Title: एकमेकांमधलं प्रेम
Post by: pallvi on October 21, 2016, 01:41:02 PM
संसार... रुटीन झालेला एक शब्द.
रोज संसार करतात, हजारो जण करतात.
इथे कुणीच न्यायनिवाडा करायला नसतं.
एखाद्याचा अन्याय करणं, दुसऱ्याचा तो सहन करणं हे दोघांमध्येच असतं.
एकमेकांमधलं प्रेम हे त्या दोघांनाच कळत असतं.

कुणालाही सिद्ध करून दाखवायचं नसतं.
जगासमोरचे मुखवटे बाजूला ठेऊन एकमेकांशी खरं वागावंच लागतं.
कारण एकांतातल्या खोट्याचं आयुष्य खूप छोटं असतं.

जग बोलून दाखवतं नात्याबद्दल... पण ते सत्यापेक्षा त्यांचं मत असतं.
खरंतर
असलेल्या नात्यापेक्षा कळलेलं नातं जास्त खरं असतं.
Title: Re: एकमेकांमधलं प्रेम
Post by: jyotilekha on November 03, 2016, 09:25:30 AM
Very nice.
Title: Re: एकमेकांमधलं प्रेम
Post by: sthakare on November 07, 2016, 12:07:15 PM
nice...
Title: Re: एकमेकांमधलं प्रेम
Post by: SANDIPATIL on November 20, 2016, 11:38:56 AM
छान