m4marathi Forum

मराठी चारोळ्या (Marathi Charolya) => प्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya) => Topic started by: pallvi on October 21, 2016, 01:43:11 PM

Title: एक मोठी घुसमट
Post by: pallvi on October 21, 2016, 01:43:11 PM
रिकामेपण

रिकामेपण अनुभवलंय का कधी?
घर माणसांनी भरलेलं असणं, आजूबाजूला माणसांची रेलचेल असणं आणि तरीही मन पोकळीच्या भोवऱ्यात अडकून जावं याहून मोठं रितेपण काय असेल?
रितेपण बोलूनही न दाखवता येणं हि एक मोठी घुसमट असते.

माझ्याजवळ असलेल्या गोष्टी इतरांना नाही मिळाल्या पण मला मिळाल्या आणि म्हणून मी खुश रहावं हे पचवणे तितकंसं सोप्पं का जात नाही?
असलेल्यांना किंमत नसते म्हणून? की नसलेल्या मागेच मन वेडं होतं म्हणून?
आनंद, राग, द्वेष यापासून माणूस इतका लांब जावा?

मदत नकोय, आधार तर नकोच नकोय. आधारातही छुपा हिशोब असतो.
कोण घेऊन फिरतंय ह्या मनाची किल्ली?
दार लावून नाही घेतलंय पण सताड उघड्या दारावरचा रिकामा उंबरा सलतोय बहुतेक.
Title: Re: एक मोठी घुसमट
Post by: jyotilekha on November 03, 2016, 09:09:16 AM
Sundar.
Title: Re: एक मोठी घुसमट
Post by: zele.dayanand on February 16, 2017, 05:29:30 AM
खूपच मस्त