pallvi

जग

खरं सांगतो, विश्वास ठेवा.
जगाला तुमच्या सुखंदु:खाशी काही घेणं देणं नसतं.
प्रत्येकजण स्वत:च्या काट्याने तुम्हाला मोजत असतो.
स्वत:च्या सुखदु:खासोबत तुमचं सुखदु:ख तोलत असतो.

बऱ्याच जणांसाठी तुमचं दु:ख हा एक चर्चेचा विषय असतो.
ज्याला काळजी असते तो चर्चा करत राहत नाही
तुमच्या सुखापेक्षा त्याच्या जल्लोषात लोकांना जास्त रस असतो
म्हणूनच समारंभाला गर्दी आणि दु:खाला एकाकीपण मिळतं.

आशु म्हणे,
दु:खात कधी हाक नको मारूस कुणाला,
जग सुखाने साथ देतं सुखाच्या सुखात