pallvi

वेड असणं बरं वाटतं
« on: October 21, 2016, 01:45:09 PM »
बरं वाटतं

आपण कुणाचं तरी वेड असणं बरं वाटतं
आपला श्वास कुणासाठी तरी गरजेचं असणं बरं वाटतं

माझं नसणं कुणीतरी टिपणं बरं वाटतं
माझं असणं कुणाचं तरी अस्तित्व असणं बरं वाटतं

कुणीतरी आपली वाट पाहणं बरं वाटतं
आपल्यासाठी तात्काळत राहणं बरं वाटतं

"येत रहा स्वप्नात" ऐकायला बरं वाटतं
शोधलं कुणीतरी तर लपायला बरं वाटतं

कुणीतरी गर्दीपेक्षा मला 'वेगळं' म्हणणं बरं वाटतं
जाता जाता माझ्यासाठी वळून बघणं बरं वाटतं

माझं असणं असलं की...तुझ्यासाठी पर्याय भ्रम असणं बरं वाटतं
माझं असणं असलं की...तुझ्याकडे क्रम नसणं बरं वाटतं

बरं वाटतं...खोलवर मनात कुणाच्यातरी... रुजलं तर
बरं वाटतं...कुणीतरी आयुष्य समजून मोजलं तर

jyotilekha

Re: वेड असणं बरं वाटतं
« Reply #1 on: November 03, 2016, 09:07:09 AM »
Atishay Sundar Kavita.