pallvi

तो म्हणाला, "खरंतर मनातच नाहीये माझ्या"
मग मीही जाऊ दिलं. म्हटलं, "जबरदस्तीचं नातं ओझ्याहून जड असतं."
तु वळूनही नाही पाहिलंस आणि माझ्या होत्या नव्हत्या अपेक्षेनेही श्वास सोडले.
एक शरीर म्हणून मी श्वास घेत राहणं योग्यच होतं,
मीही तो घेत राहिले... निर्लज्जपणा नाही वाटला कधीच.
कदाचित प्रेमबीम सगळं खोटं असतं असा प्रसंग असेलही हा.