m4marathi Forum

मराठी चारोळ्या (Marathi Charolya) => प्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya) => Topic started by: SANDIPATIL on November 20, 2016, 12:16:24 PM

Title: प्रेमाची कहाणी
Post by: SANDIPATIL on November 20, 2016, 12:16:24 PM
प्रेमाची खरच
अजब असते कहाणी
ओठ राहतात मुके
अन डोळ्यांतून वाहते पाणी

संदिप
Title: Re: प्रेमाची कहाणी
Post by: SANDIPATIL on November 20, 2016, 12:18:23 PM
मित्रहो कृपया आपले अभिप्राय देत चला
जेणेकरून मला चुका सुधारता येतील
Title: मी रोज झुरतोय तुझ्यासाठी
Post by: Rahul Vitkar on December 17, 2017, 11:38:12 AM
मी रोज तुझ्या साठी झुरतोय

तुझ्या चेहऱ्या वरच हसु पाहन्या साठी
रोज मी झुरतोय
तुझ्या कोमल हाताना स्पर्श करण्या साठी
रोज मी झुरतोय
तुझ्या डोळ्यांचा इशारा पाहन्या साठी
रोज मी झुरतोय
तु माझ्या आयुष्यात पुन्हा केव्हा येशील या साठी
मी रोज झुरतोय
तु तुझ्या कोमल हातांनी मला घास
केव्हा भरवशील या साठी
मी रोज झुरतोय
तु खिड़कीतून पुन्हा केव्हा चोरून पाहशील या साठी
मी रोज झुरतोय
तुला पुन्हा माझ्या आयुष्यात आनण्या साठी
मी रोज झुरतोय
मला माहित आहे तु माझी होऊ शकत नाही
तरी देखिल तुझ थोडस प्रेम मिळवण्या साठी
मी झुरतोय
कारण प्रेम किती जरी
लांब जाण्याचा प्रयत्न करत असल तरी
एक ना एक दिवस खऱ्या प्रेमाची आठवण येतच असते
ते प्रेम आज ही टीकवुन ठेवण्या साठी
मी रोज झुरतोय मी रोज झुरतोय.....
Title: Re: प्रेमाची कहाणी
Post by: तुझी आठवण on January 13, 2018, 12:24:16 PM
तुला वाटल तू आलीस तुला पटल तू बोललीस तुला राग आला तू सोडून गेलीस माझ काय :'( :'( :'(