Ranjit Mengawade

बोलणे
« on: February 25, 2020, 09:06:02 PM »
प्रेमात तुझ्या धुंद राहावे
स्वप्नाच्या दुनियेत असेच चालावे...
सोबतीने तुझ्या जग विसरून जावे
माझा मी तुझा व्हावे...

मनात होते बोलावे
बोलूनच दाखवावे ||

आठवूनी तुला स्मित हास्य यावे
मनात तुझेच चित्र रंगावे...
भेटीच्या आतुरतेने मन प्रफुल्लित व्हावे
बाकी कशाचे भान न रहावे

मनात होते बोलावे
बोलूनच दाखवावे ||

तुझ्या विचारांनी तनमन विसरावे
अग, वेड झालय मन त्याला कस समजावे...

मनात होते बोलावे
बोलूनच दाखवावे ||


                             - रणजित मेंगावडे ✒️