Shreyash

असावं कोणीतरी
« on: August 09, 2017, 08:28:30 AM »
असाव कुणीतरी
कधी वाद घालणार
खोटा रुसवा आणून ,पुन्हा आपल्यावरच रागावणार.........
असाव कुणीतरी 
मनमोकळ बोलणार 
काहीही न सांगता ,अगदी मनातल ओळखणार......
असाव कुणीतरी 
स्वप्नात दिसणार 
झोपलेले असताना ,त्याचेच स्वप्न बघणार .....
असाव कुणीतरी 
चाहूल ओळखणार 
अलगद चालताना ,पायाची रुणझुन ऐकणार.........
असाव कुणीतरी 
प्रेम करणार 
ती सोबत असताना,अगदी सगळाच विसरणार.......
असाव कुणीतरी 
आठवण काढणार...
                                (श्रेयश)