Chota Kavi

उगाचच..
« on: April 14, 2012, 08:02:52 PM »
एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!