jyotish jagat

वटपौर्णिमा
« on: June 27, 2018, 08:24:33 AM »
वटपौर्णिमा

 वट सावित्रीचे व्रत जन्मोजन्मी (७ जन्म ) हाच पती मिळावा म्हणून केले जात नाही , तर आपल्या पतीला चांगले आरोग्य, दीर्घायुष्य,(अखंड सौभाग्य) संपत्ती , पुत्र पौत्र व सन्मान लाभावा म्हणुन केले जाते. (* ७ जन्म हाच पती मिळावा, अशा चुकीच्या समजुती चित्रपट व टी. व्ही. मालिकातून पसरविण्यात आल्या आहेत व लोकांनाही धर्मशास्त्राचे ज्ञान नसल्याने त्या गोष्टी खर्या मानल्या गेल्या आहेत. ) या व्रताचा संकल्प असा आहे. -” मम इहजन्मनि अखंड सौभाग्य पुत्र पौत्र धनधान्य ऐश्वर्य अभिवृध्द्र्थम वटमुले ब्रम्ह सावित्रीदेवाता प्रित्यर्थ ।” * यात कुठेही ७ जन्म हाच पती मिळावा असा शब्दही नाहि आहे. आज सुशिक्षित (?) लोकच जास्त चुकीच्या समजुती पसरवितात.

वट सावित्रीच्या व्रताचा बोध-
महान पतीव्रतेत सावित्रीची गणना आहे, ती प्रातःस्मरनिय आहे , तिला यमजेत्री असे म्हणले आहे. असे असताना हे व्रत गुलामीचे निदर्शक कसे होते? सत्यवानाशी विवाह केल्याने जी सुख दुःखे पदरी येतील ती सोसण्याची तिचीतयारी आहे , सावित्री हि एखादी विलासलोलुप , ब्रमर वृत्तीची युवती नव्हती. ती तेजस्वी आणि निश्चयी होती . प्रसंगी ठामपणे व योग्य निर्णय घेण्याचा गुण आपल्या अंगी यावा , हा बोध यातून घेतला पाहिजे………… संपूर्ण लेख खालील लिंकवर वाचा ..आवडल्यास शेअर जरूर करा...  subscribe our website for regular updates……. http://www.jyotishjagat.com/%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/