Bhushan

* भूकंप *
« on: December 11, 2009, 02:23:02 PM »
* भूकंप *

भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणिती "सेस्मिक लाटा" तयार होवून पृथ्वी च्या पृष्ठभागाची हालचाल होण्यात होते. यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात.

भुकंपाची तिव्रता मोजण्याच्या यंत्रास "सिस्मोग्राफ" अथवा "सिस्मोमिटर" असे नाव आहे तसेच भुकंप मोजण्यासाठी "रिष्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. ३ रिष्टर स्केल वा त्या पेक्षा कमी तिव्रतेचे भुकंप धोकादायक नसतात. तिव्रता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होवू शकते.

समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भुकंप प्रलयांकारी त्सुनामी निर्माण करू शकतो.

भुकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ-चकत्यां मधील घर्षण हे असले तरी खालील पैकी कोणत्याशी कारणाने भूगर्भातील हालचाल व भुकंप होवू शकतो.

ज्वालामुखी जागृत झाल्याने.
खाणींमध्ये केलेले कृत्रिम स्फोट.
अणूचाचण्या.
[संपादन]भुकंपमापक रिष्टर परीमाण
भुमध्याजवळील(एपिसेंटर)वेगवेगळ्या तिव्रतेच्या होणार्‍या भुकंपाचे परीणामांचे वर्णन खाली दिले आहे. या तक्त्याचा विशेष काळजीपुर्वक अभ्यास करावयास हवा कारण, भुकंपाची तिव्रता व तदानुषंगाने होणारे त्याचे परीणाम फक्त त्याच्या तिव्रतेवरच अवलंबुन नसुन त्याचे भुमध्यापासुनचे अंतर,भुमध्याखालील त्याच्या केंद्राचे(फोकस) अंतर,व भौगोलीक परीस्थिती यावरही अवलंबुन असते.(काही प्रदेश भुकंपाच्या संकेतांची(सिग्नलस्) तिव्रता वाढवतात.)[१]

’रिष्टर तिव्रता’   वर्णन   भुकंपाचे परीणाम   होण्याची वारंवारीता
2.0 पेक्षा कमी   सुक्ष्म   सुक्ष्म, लक्षात येत नाही.   जवळ्पास प्रतीदिन ८,०००
2.0-2.9   किरकोळ   सामान्यतः लक्षात येत नाही.
.

जवळपास प्रतीदिन १,०००
3.0-3.9   .कधी-कधीच लक्षात येतो,पण नुकसानकारक   ४९,००० दरवर्षी(अंदाजे)
4.0-4.9   हलका   घरघुती वस्तुंचे लक्षात येण्याजोगे हालणे,द्रुष्य नुकसान नाही.   ६,२०० दरवर्षी(अंदाजे)
5.0-5.9   मध्यम   थोड्या क्षेत्रात अयोग्य रित्या बांधलेल्या इमारतीस जास्त नुकसान,योग्यरीत्या डिझाईन केलेल्या ईमारतीस अत्यल्प नुकसान   ८०० दरवर्षी(अंदाजे)
6.0-6.9   जोरदार   १६० कि.मि.(१०० मैल)रहिवासी क्षेत्रात नुकसानकारक   दरवर्षी(अंदाजे) १२०
7.0-7.9   प्रमुख   मोठ्या क्षेत्रात अत्याधिक नुकसान   १८ दरवर्षी(अंदाजे)
8.0-8.9   मोठ्ठा   सभोवतालच्या कितीतरी १०० मैल क्षेत्राच्या परीसरात अत्याधिक नुकसान   दरवर्षी १
9.0-9.9   सभोवतालचे १००० मैल क्षेत्र धराशयी
२० वर्षात १
10.0+   पुर्ण पृथ्वी   अद्याप नोंद नाही.
फारच दुर्लभ(माहित नसलेला)