Bhushan

* एव्हरेस्ट  सर्वात उंच पर्वतशिखर आहे काय ?

कालापत्थरहून दिसणारे एव्हरेस्ट शिखर

माउंट एव्हरेस्ट
माउंट एव्हरेस्टचे नेपाळ-तिबेट सीमेजवळील स्थान
उंची   २९,०२९ फुट (८,८४८ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक   १
ठिकाण    सगरमाथा अंचल, नेपाळ
 तिबेट, चीन
पर्वतरांग   हिमालय
गुणक   27°59′17″N 86°55′31″E
पहिली चढाई   २९ मे १९५३
 एडमंड हिलरी
 तेन्झिंग नोर्गे
सोपा मार्ग   साउथ कोल
माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालका पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.

सन १८५६ मध्ये ब्रिटीश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. ह्या आगोदर हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. १९६५ मध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने अँड्रु वॉ ह्यांच्या शिफारसीनुसार ह्या शिखराचे माउंट एव्हरेस्ट असे नामकरण करण्यात आले.

माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंचीचे शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत. तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटीश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर ३,६७९ चढाया २,४३६ गिर्यारोहकांकडून झाल्या आहेत.

एव्हरेस्ट भौगोलिक्
नेपाळी भाषेत एव्हरेस्टचे नाव सगरमाथा असे आहे व तिबेटियन भाषेत त्याला चोमोलुंग्मा (विश्वाची माता) असे आहे. चीनी भाषेत Zhūmùlǎngmǎ Fēng (珠穆朗玛峰) असे आहे.

सर जॉर्ज एव्हरेस्ट
सर जॉर्ज एव्हरेस्ट हे १८४० मध्ये ब्रिटीश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्ट यांनी १८४१ मध्ये या पर्वत रांगांना अतिउंच रांगांमध्ये समाविष्ट करण्यात आले. पहिल्या प्रथम याला पीक बी असे नामकरण केले. १८४८ मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पीक XV असे नामकरण केले. कांचनगंगा पर्वताला तोवर सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. अँड्रु वॉ यांनी उपकरणांनी याच्या उंचीची मोजणी केली व त्यानंतर १८५२ मध्ये देहरादून व कोलकातामधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पिक XV ची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व याचे सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले. [१] १८५६ मध्ये याला एव्हरेस्ट यांच्या सहकार्‍यांकडून या शिखराचे नामकरण माउंट एव्हरेस्ट करण्यात यावे अशी मागणी केली.

चीन, तिबेट व नेपाळ यांनी आपापल्या परीने एव्हरेस्ट ला फक्त त्यांच्या नावाने संबोधले जावे असे प्रयत्न केले. परंतु इतर सर्व देशात शिखराला एव्हरेस्ट याच नावाने ओळखले जाते.

मोजमाप
एव्हरेस्टची दक्षिण बाजू, विमानातून घेतलेले छायाचित्र. समोरील ल्होत्से शिखर तर डावीकडील नुपत्से
सर्वप्रथम अँड्र्यू वॉ यांनी १८५६ मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणानुसार माउंट एव्हरेस्टची ( तत्कालीन पीक XV)उंची २९,००२ फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. याकामी अनेक भारतीय गणित तज्ञ गुंतले होते व अनेक वर्ष गणिते करुन हे मापन मांडले होते.

सर्वात अलिकडे एव्हरेस्ट ची उंची ८,८४८ मीटर इतकी अधिकृत उंची म्हणून निश्चित करण्यात आली आहे. तरीही अनेक मापनकर्त्याच्या मापनात तफावत आढळून येते. ९ ऑक्टोबर २००५ रोजी चीन ने घेतलेल्या अधिकृत मोजणी नुसार पर्वताची उंची ८,८४४.४३ मीटर ± ०.२१ मीटर इतकी मोजणीची अचूकता नोदवण्यात आली आहे. [२] ही उंची एव्हरेस्टवरील बर्फाच्या लादीची उंची वजा जिथे खडक संपतो तेथवरुन काढली आहे. चीनी मापनकर्त्याना लादी ची उंची साधारणपणे ३.५ मीटर इतकी आढळली.[३] व खडक व बर्फाची लादी या दोघांची मिळून एकत्र उंची ८,८४८ इतकी निश्चित करण्यात आली आहे.

तुलना
एव्हरेस्ट हे जगातील समुद्रसपाटी पासूनची सर्वोच्च जागा आहे यात दुमत नाही. परंतू अनेक पर्वत असे आहेत की ज्यांची बेस कँप पासूनची उंची ही एव्हरेस्ट च्या बेसकँप पेक्षा जास्त आहे. मौना की हा हवाईमधील पर्वत समूद्राच्या तळापासून उंचावतो व जवळपास १०,००० मीटर त्यांची उंची आहे, परंतू पाण्याखाली जवळपास ५,००० मीटर असल्याने प्रत्यक्षात समुद्रसपाटीवरील उंची एव्हरेस्ट पेक्षा बरीच कमी आहे. ( साधारणपणे ४,२०५ मीटर)[४]

जर बेसकँप पासूनची उंची ग्राह्य धरण्यात येत असेल तर अमेरिकेच्या अलास्का राज्यातील माउंट मॅककिन्ले हा पर्वत सर्वात उंच् आहे. [४] हा पर्वत त्याच्या बेसकँप पासून ५,६०० मीटर इतका उंच आहे तर परंतू त्याची समुद्रसपाटी पासूनची उंची ६,१९३ मीटर इतकीच आहे. [५] तर एव्हरेस्टची दक्षिण बाजूकडील बेसकँपपासूनची उंची ४,६५० मीटर इतकी आहे.[६]

चढाईसाठी मार्ग
अंतराळातून घेतलेल्या छायाचित्रात दक्षिणेकडील व उत्तरेकडील मार्ग अधोरेखित केला आहे.
मां. एव्हरेस्ट वर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. आग्नेयेकडील पर्वत रांग जी नेपाळच्या हद्दीत आहे व इशान्येकडील रांग जी तिबेटमधून येते. या व्यतीरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत.[७] या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोयीस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्ती पसंतीचा आहे. ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेन्झिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिली चढाई केली होती. [७] चीनचे पाश्चिमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.[८]

अंतराळातून दिसणारा साउथ कोल व नोर्थ कोल चा मार्ग
चढाई साठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. हिवाळ्यानंतरचा कडक बर्फ भरपूर असतो जे चढाईसाठी आवश्यक आहे. तसेच हवामानातील बदलामुळे वार्‍याची दिशा उत्तरेकडे होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो. [९][१०] काहीवेळा मान्सूननंतरच्या काळात चढाईचे प्रयत्न होतात परंतु. सोसाट्याचा वारा, मान्सूनमुळे पडलेला जास्तीचा व भुशभुशीत बर्फ व हवामानातील सातत्याचे बिघाड यामुळे चढाई अवघड होउन बसते.

चढाया

सुरुवातीचे प्रयत्न

तिबेटच्या उत्तर बाजूने दिसणारे एव्हरेस्टचे दृश्य व रोंगबुक मॉनेस्ट्री
सन १८८५ मध्ये आल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिंटन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाईकरणे शक्य आहे हे नमूद केले होते.[११]

जॉर्ज मॅलोरी
जॉर्ज मॅलोरी यांनी १९२१ मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलोरी यांनी आपल्या शोधाकार्यात पार एव्हरेस्ट च्या सोंडांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलोरी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी नॉर्थ कोल (७,००७ मी) वर पाउल ठेवले. नॉर्थ कोलवरुन त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहिमा इतक्या उंची साठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले.

पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटीशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम् आखली.या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ८,००० मीटरपेक्षा चढाई करणारे पहिले व्यक्ती बनले. ही मोहिम जॉर्ज मॅलोरी व ब्रिटीशांच्या अखिलाडू वृती साठी गाजली. मॅलोरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्न केला. मॅलो‍री यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले.

१९२४ मध्ये मॅलोरी यांनी पुन्हा ब्रिटीश मोहिम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलोरी व ब्रुस यांचे प्रयत्न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलोरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकँप कडे परत पाठवले व स्वता: मोहिमे फत्ते करायची ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलोरी चढाई करत असताना मरण पावले. १ मे १९९९ रोजी मॅलोरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेले मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलोरी यांनी हिलरी व नोर्गेच्या २४ वर्षे आगोदरच यांनी एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहका-यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरुन त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे.

१९५२ मध्ये स्विस संघाने शर्थीचे प्रयत्न केले या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनाँ यांनी केले होते. डुनाँ यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदी मधून साउथ कोल ७,९८६ मीटरs (२६,२०१ ft) उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लँबर्ट व शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी ८,५९५ मीटरs (२८,१९९ ft) इतकी उंची गाठली जो नवा विक्रम होता. स्विस संघाला आल्पस मधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पांशी वर्तन अतिशय खेळिमेळीचे असायचे यामुळे स्वीस संघाला पुर्वीच्या ब्रिटीश संघांपेक्षा चांगले यश मिळाले. [१२] [१३]

तेन्झिंग नोर्गे व हिलरींचे पहिले पाउल
शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांचे एव्हरेस्टवरील पहिले पाउल. हिलरी यांनी काढलेले छायाचित्र
१९५३ मध्ये ९ वी ब्रिटीश मोहिम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटीश अधिकारी जॉन हंट यांच्या कडे होते. यांनी पुर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. तेन्झिंग नोर्गे याला त्या अंतर्गत मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्न केले शिखरापासून १०० मीटर पर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमवणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायद तेन्झिंग नोर्गे व न्यूझीलंडचे एडमंड हिलरी या जोडीला झाला. दोनच दिवसांनी नोर्गे व हिलरी या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले. २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाउल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपीत कायम ठेवले होते. तेन्झिंग नोर्गेने आपण हिलरी नंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले.[१४]. शिखरावर हिलरी यांनी फोटो काढले व जोडीने मिठाई खाउन आनंद साजरा केला.

एव्हरेस्ट सर केल्याची बातमी लंडनला राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पोहोचली. एव्हरेस्ट सर केल्यामुळे मुळे ब्रिटीश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना सर किताबाने सन्मानित करण्यात आले. तेन्झिंग नोर्गे यांना जॉर्ज मेडलने सन्मानित करण्यात आले. तर हिलरी यांना न्यूझिलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ न्यूझिलंड मिळाला. ऑर्डर ऑफ न्यूझिलंड मिळणारे हिलरी हे पहिले नागरिक होते. तेन्झिंग नोर्गे यांना भारत सरकारचेही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विना ऑक्सिजनचे प्रयत्न
८ मे १९७८ रोजी इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रीयाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत एव्हरेस्टवर चढाई केली. या चढाईत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजनच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला नाही. राईनहार्ड मेसनर यांनी पुन्हा १९८० मध्ये एव्हरेस्ट वर पुन्हा एकदा विनाऑक्सिजन एकट्याने चढाई केली.
भारतीय चढाया
पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतातही गिर्यारोहकांचे एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न असते. परंतु बहुतेकांना जबर खर्चामुळे ते परवडत नाही .जरी एव्हरेस्ट हे भारतातले शिखर नसले व खर्च अति असला तरी भारतीयांनी केलेल्या चढायांची संख्या लाक्षणीय आहे. तेन्झिंग नोर्गे जे पहिले चढाई करणारे होते त्यानी नंतरच्या काळात भारतीय नागरिकत्व घेतले होते. त्यानंतरच्या बहुतांशी भारतीय चढाया ह्या भारतीय सैन्यदला तर्फे आखल्या गेल्या. पहिली भारतीय मोहिम १९६० मध्ये राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडियर जी. सिंग यांच्याकडे होते. परंतु पहिले यश १९६५ मधील तिसर्‍या मोहिमेत मिळाले.१९८४ मधील नागरी मोहिमेत बचेद्रींपाल ह्या एव्हरेस्ट सर करणार्या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक झाल्या. त्यानंतरही अनेक भारतीय महिलांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवले आहे.

मराठी पाऊल
१९ मे १९९८ रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. भारतीय पथकाचे नेतृत्व करताना सुरेंद्र चव्हाण यांना १९९८ मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला.[१६] यापूर्वी २ मे १९९२ रोजी डॉ दिपक कुलकर्णी यांना चढाई करताना मरण आले [१७].

महत्त्वाच्या घडामोडी

१९९६ मधील दुर्घटना
एव्हरेस्टवर १९९६ च्या चढाईच्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला व गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी नोंद झाली. त्यातील ११ मे रोजी सर्वाधिक ८ जण मरण पावले. या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले, भारतातही बातम्यां व वृतपत्रात हा विषय चांगलाच गाजला व एकूणच एव्हरेस्टवर चढाईसाठी व नाव कमवण्यासाठी गिर्यारोहकांकडून हलगर्जी होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच नेपाळ सरकारवरही एव्हरेस्टच्या मोहिमांचे बाजारीकरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एव्हरेस्टवर चढाईसाठी पात्रता निकष कडक करण्याची सार्वत्रिक मागणी झाली.

मे २००४ मध्ये कॅनडामधील टोरोंटो विद्यापीठातील डॉ केंट मूर व जॉन सेंपल यांनी अभ्यासांती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान निर्माण झाले होते ज्यामुळे त्या उंचीवरील ऑक्सिजन अजून विरळ झाला होता, ऑक्सिजनची पातळी १४ % पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.