marathiadmin

मकर संक्रांति , Makar Sankranti.
« on: January 15, 2011, 10:07:23 AM »
मकर संक्रात :
सूर्याने मकर राशीत प्रवेश करणे याला मकर संक्रात म्हणतात. उत्तरायण सुरू होते तो हाच दिवस. दिवस मोठा आणि रात्र लहान अशी वेळेची विभागणी या दिवसापासून सुरू होते. (पण कडक थंडीच्या दिवसांत २२ डिसेंबरला त्याचा अनुभव येतो.)

तीळ या उष्ण प्रकृतीच्या, तेल निघणार्‍या पिकाची या वेळी सगळ्यांना विशेष आठवण येते. कारण तीळ आणि गूळ यांपासून बनवलेल्या वड्या किंवा लाडू मकर संक्रातीला एकमेकांना देण्याची पद्धत आहे. तीळ पौष्टिक असतात, त्याचे तेल गुणकारी असते. या सुमाराला नवा गूळ तयार होतो. बाजरीही उष्ण असते आणि याच सुमाराला बाजारात येते. वांगी तयार होतात, पावट्याच्या शेंगा काढण्यायोग्य होतात, शेतात लावलेला चणासुद्धा या सुमाराला अगदी लहान-कोवळा असतो. त्यामुळे या सर्व नव्याने शेतातून येणार्‍या भाज्या, बाजरीची तीळ लावून बनवलेली भाकरी असा विशेष बेत या सुमाराला करण्याची पद्धत आहे. स्निग्धता देणारे तीळ आणि गुळाचा गोडवा असे एकत्र आल्याने लोकांचे प्रेमाचे नाते टिकते असे प्रतिकात्मक रूपही या सणाला दिले गेले आहे. त्यामुळे ‘तीळगूळ घ्या-गोड बोला’, असे म्हणण्याची पद्धत आहे. मतभेद, भांडणे विसरून एकत्र येण्याची संधी देणारा हा सण आहे.

विवाहित स्त्रिया संक्रातीचे हळदी-कुंकू करून सौभाग्यवती स्त्रियांना ‘वाण’ देतात म्हणजेच काही वस्तू वाटतात. संक्रांतीच्या दिवशी पाच सौभाग्यवतींना पाच मातीची छोटी भांडी म्हणजे सुगड देण्याची एक पद्धत आहे. सुपारी, गहू, कापूस, ऊस, बोरे, भुईमुगाच्या शेंगा, पैसे घालून हळदी-कुंकू लावून मातीच्या भांड्यांची पूजा करतात व नंतर ती भांडी पाच जणींना देतात. या सर्व नव्या पिकांनी घर भरू दे असे सांगणारी ही एक पद्धत असावी.
मी मराठी