Chota Kavi

कैफियत राखीची...........!!!!!!!!
« on: August 13, 2012, 12:14:16 PM »


कैफियत राखीची..
_____________________


गाव.. देश.. पार करीत
मी आलेच तुझ्यापर्यंत
ती नाही आली याच
वाईट नको वाटून घेऊ...!!!

समजून घे तिच्या अडचणी
तिच्या भावना.. तिची माया..
ती तर कायम
तुझ्यासोबत आहे आणि असेल...!!!

जीवनात एक वेळ येते अशीही..
समजून घ्यायच..
आपल्यातरी हातात काय..??
सध्या फक्त एक राखी आहे...!!!

स्वता घे बांधून हातात..
स्वताच टिळा ओढ..
साखरही स्वताच भर तोंडात...
सगळ काही आनंदाने पूर्ण कर...!!!

तिला एक फोन कर म्हण..
मला राखी मिळाली..
छान आहे.. तुझ्या सारखी
त्यात दिसते मला तुझी
माया.. ममता.. प्रेम...!!!

जिव्हाळा सार्‍याना सारखाच
कदाचित तीही दुखी असेल..
येऊ नाही शकले म्हणून..
तुला जास्त नको वाईट वाटायला
म्हणून तीपण लपवत असेल
तुही समजून घे तिला...!!!

शेवटी काय
वेड्या बहीनीची
माया ही वेडी...
अशीच तर असते...!!!