Chota Kaviकोण सावरेल माझ्या शब्दाना
कुणाला समजतील
भावना माझ्या शब्दांच्या...!!!

त्यात दिसेल घोंगवणारे वादळ
तर कधी निरव शांतता..
विरह वेदनेची कळ आहे
तर कधी सुखाची लहर
हसण पण आहे
थोड रडण पण आहे...!!!

मूठभर राखेचा करडा रंगपण आहे..
जन्मलेल्या बाळाच रडण आणि
त्याला पाहून आईच्या चेहर्‍यावरील
कौतुकाच हसूपण आहे...!!!

प्रश्न आहे तो तुमच्या लेखणीचा
तुमच्या आकलन शक्तिचा..
सगळ्या हालअपेष्टांच्या व आनंदाच्या
भट्टीतून तावुन सुलाखुन काढा
तुमच्या लेखनीला आणि
भावनेच्या आद्य शक्तिकेंद्राला...!!!

तेव्हाच कुठे
माझे शब्द..माझ्या भावना..
तयार होतील यायला
लेखणीत तुमच्या
आणि मनात...!!!