nakul

माउली!!
« on: July 18, 2014, 02:22:24 PM »
एकादशीला पंढरपुरात यात्रा भरली
वारकर्यांसोबत पंढरी हि गजबजली 
स्वर्गातून हि अवतरली, माउली माझी
वारकर्यांचा रक्षणात ती धाऊन आली
आनंदाचा क्षण घेऊन हि आली
आम्हा लेकराची ती आई झाली
तालाचा गजरात चंद्रभागा हि नाचली
विठूचा नामघोषात पालखी आळंदीला पोहचली
एकादशीचा उपवास ठेवतो
माउलीला आम्ही फराळाचा भोग देतो
अशीच तू येत राहा
पंढरपुरातच राहत जा
परमात्म्याच रूप तू सार्या जगाला सुख देत राहा. 
माउली!!माउली!! माउली!!
                                          - नकुल शिंपी
 
Nakul shimpi