Chota Kavi

आयुष्याचा झुला .......!
« on: August 13, 2012, 12:19:52 PM »


आयुष्याचा झुला
जन्मताच रे मायेने हाती अन्दुळले तुला
बाळ किती कौतुकाचा त्याला पाळणा बांधिला
त्याच पाळण्याचा झाला तुझ्या आयुष्याचा झुला
काय भाग्य ठावे तिला खेळ सुखाचा मांडिला
झुला उंच आकाशात सुख आशेच्या टोकाला
मागे परतून येता दु:ख उभे आडोशाला
हाव सुखासीनतेची होई कारण मोहाला
दु:ख पदरी पडता बोल लावी नशिबाला
असा जुगार सुखाचा नको भार जीवनाला
मंद झुलवी रे झुला भोग येई ते वाट्याला