anagha

baba
« on: October 04, 2013, 12:40:44 PM »
     बाबा

चंदना सारखा झिजतो तो,  कुटुंबासाठी घाम गाळतो ,
स्वकष्टाचे  चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून  घरटे बांधतो तो ।

 असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो,
उनपावसाचा  मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी  करतो  तो।

माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो ,
आद्य कर्तव्याची कास धरतो ।

घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज  उभा राहतो तो,    
दिसत  नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता,
सहन शिलतेचा मंत्र    सतत   जपत असतो तो।

उच्च अधिकारी होतो  तो,
गर्व नाही ,अभिमान  बाळगतो तो I

कल्परुक्षाचे  झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी  आज मात्र झोकून देतो।
जाणीव  असावी मुलांना  असा कष्टकरी बाबा आपला असतो।

Manohar Kale

Re: baba
« Reply #1 on: September 03, 2014, 01:41:27 PM »
 :)Khup Chhan Kavita aahe Tumchi Manapasun Avadali. Hardik shubhechha.