sonam

कुणब्याच पोर - कालेजात गेलं.
खटक्यावर बोट_ जाग्यावर पलटी
गावाकडली शाळा, पलीकडली हायस्कूल
माय-बापाच्या डोक्यात शिकाण्याच खुळ
रोजंदारीच काम उघड्यात केलं
कुणब्याच पोर, कालेजात गेलं ||

तुटलेली चप्पल, नी फाटलेली विजार
चुरघळलेल्या शर्टाला गुंडीचा आधार
पोरांना पाहून खुपच भ्यालं


छातीतली घर-घर, नी कावरी बावरी नजर
पोरिनच्या हसण्याने पडली भर
वर्गात गेल्यावर तर रडूच आल
कुणब्याच पोर, कालेजात गेलं ||

ओळख ना पाळख नाही कोणी मित्र
मास्तरने सुरु केल ओळखीच सत्र
जात सांगतांना कुठून बळ आल
कुणब्याच पोर, कालेजात गेलं ||

पोरा-पोरिनच्या गप्पा ,जोर जोरात हसन
पोरीच याच्या बेंचवर बसन
बेंचवरल्या पोरीच सपन आल
कुणब्याच पोर, कालेजात गेलं ||


  Best marathi kavita .  marathi kavita .