Chota Kavi

किती सुंदर आहे हे जीवन,
स्वप्ना पलीकडे सगळे घडते,
कधी तरी विचारात असलेले क्षण मी आज जगते.

तू असताना मी हे जग विसरते,
फक्त तुझ्या सोबत ते क्षण सावरते,
कितीदा तरी माझ्यातच मी हरवते,
तुझ्या नजरेला नजर मिळताच मी नजर झुकवत,

मी अवस्थ, गोंधळलेली असते,
तू माझ्या विचारांची गती भापण्याच्या प्रयत्नात असतो,
तुला जसेच माझ्या मनातले गोंधळ कळते,
त्या क्षणी माझी मीच लाजते.

तू नसताना खूप काही बोलायचे असते,
पण मनातली गोष्ट मनातच राहते...