Chota Kaviनिरभ्र आकाशात कुठेही
मागमूस नव्हता
वादळ वार्‍याचा..
पक्षी सारे मनसोक्त वावरतात
निळ्या छ्ताखाली
पंख पसरावून
छोट्या छोट्या स्वप्नांना
छोट्या छोट्या डोळ्यात भरून...!!!

सर्व सुरळीत आहे..
काळे ढग जमत आहेत..
भावनेचा कोंडमारा होत आहे..
वाटत सार काही आता
वादळात शमून जाणार...!!!

तकलादू नाती सहज तूटतात
अविश्वासाच्या वादळी तडाख्यात..
काही तशीच तग धरून राहतात
झाडांच्या घट्ट मुळाप्रमाणे विश्वासाने...!!!

पसरलेल्या वादळात
काही नाती वाहून जातात..
काही नाती नवीन होतात..
मनाच काय...???

वादळ हळूहळू शमत गेल..
परत आकाश निरभ्र..
परत पक्षी बगाडतात..
चित्र मात्र जरा वेगळ आहे...!!!

पाउल उचलत नाही मला..
माझ्याच पायाखाली दिसतो मला
अश्रुंचा सडा पडलेला..
स्वप्नांचा चुराडा उन्हात चमकणारा
सुकलेली फुले प्रीतीचे..
नात्यांची झालेली ससेहोलपट...!!!

मी का तमा करावी..
परक्या वादळांची..
परक्या त्या दुखांची..
वादळ माझ्या मनातले
तिच्या जाण्याने शमेल कधीतरी
असे सध्या तरी नाही वाटत...!!!

मनातले हे वादळ
कुणाचे.. किती बळी घेणार
सांगता पण येणार नाही...!!!