Chota Kavi

वल्गना... marathi kavita .
« on: August 13, 2012, 12:01:09 PM »


वल्गना...
___________

आभाळ दाटले
हूरहुर काळजात..
आठवण ती कुणाची
कायम मनात...!!!

पाउस बरसतो
पक्षी घरट्याबाहेर..
चालतो मी असा
ना घर ना दार...!!!

चातक आतुर बोलावतो
गार ओल्या भेटीला..
अती पाउस काय कामाचा
करपल्या त्या रानाला...!!!

दुखी माझ्या मनाची
दुखी ही कल्पना..
आनंदी त्यांच्या क्षणात
समजेल का ही वल्गना...!!!